Arrested News esakal
नाशिक

Nashik Crime News : दहिदी शिवारातील विवाहितेचा खून चोरीच्या उद्देशाने; संशयित ताब्यात

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : दहिदी (ता. मालेगाव) शिवारात कांद्याच्या शेतात पाणी भरणाऱ्या विवाहितेचा खून चोरीच्या उद्देशाने झाला हाेता. या खून प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलिसांना यश आले आहे.

अवघ्या तीन दिवसात वेगाने तपासचक्रे फिरवून हा गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने संशयिताला ताब्यात घेतले आहे. सोमवारी (ता.३०) अनोळखी हल्लेखोराने सुमनबाई भास्कर बिचकुले (वय २८, रा. दहिदी) या विवाहितेचा फावड्याने वार करत दोन्ही पाय तोडून खून केला होता. (Murder of married woman in Dahidi Shivara with intent to robbery Suspect in custody Nashik Crime News)

दहिदी येथील खूनाचा तपास पोलिसांसाठी आव्हान होता. जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या.

श्री. उमाप, अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, पोलिस उपअधिक्षक पुष्कराज सूर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक मयूर भामरे, तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील व सहकाऱ्यांनी या गुन्ह्याचा छडा लावला.

सुमनबाईचा खून करुन लुटलेले चांदीचे दागिने संशयित मोडण्यासाठी करंजगव्हाण येथील सराफ व्यावसायिकाकडे गेला. गुन्हे शाखा व तालुका पोलिसांच्या पथकाने शहर व तालुक्यातील सर्व सराफ व्यावसायिकांना याबाबत पुर्व सूचना दिल्या होत्या. यामुळे संबंधित सराफाने तातडीने पोलिसांना माहिती कळवली.

सराफ व्यावसायिकाच्या दुकानात लुटलेली चांदी विक्रीसाठी आलेला संशयित सीसीटीव्हीत कैद झाला. यानंतर पथकाने वेगाने तपास चक्रे फिरविली. गुप्त बातमीदारांना माहिती कळवली. करंजगव्हाण येथून फरार झालेला संशयित कुसुंबा रस्त्याने गेल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी डोंगराळे शिवारात सापळा रचून संशयिताला अटक केली.

पोलिसांना पाहताच संशयिताने गाव स्मशानभूमीजवळील तलावात उडी मारली. पोलिसांनी दोघांच्या मदतीने त्याला बाहेर काढून ताब्यात घेतले. किरण ओमकार गोलाईत (वय ३३, रा. साजवहाळ) असे संशयिताचे नाव आहे.

किरणने कांद्याच्या शेतात एकटी महिला पाणी भरत असल्याचे पाहून लूट करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला केला. या महिलेच्या पायात चांदीचे मोठे कडे होते. महिलेने प्रतिकार केला असावा. त्यामुळे त्याने थेट फावड्याने वार करीत महिलेचे दोन्ही पाय तोडून टाकले.

कडे काढून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने काही अंतरावरील पाणताची शेवडी शिवारातील जंगलात फेकून दगड माती टाकून पाला पाचोळ्याखाली बुजून टाकला. संशयिताने जंगलात दुचाकीवर मृतदेह टाकून नेल्याचा संशय आहे.

मयत सुमनबाईचे सासू-सासरे जेठाणीच्या वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालयात, तर पती भास्कर मका विक्रीसाठी गेला होता. लहान दीर हा अंध असल्याने हल्लेखोराने संधी साधली. तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

आर्थिक विवंचनेतून खून व लूट

किरण गोलाईत हा उत्कृष्ट सेंट्रींग कारागिर होता. त्याने सेंट्रींग कामासाठी आणलेल्या काही प्लेट विक्री केल्या होत्या. गेल्या काही दिवसापासून तो आर्थिक विवंचनेत होता.

यातच घेतलेली कामे पूर्ण न केल्याने संबंधित घरमालक व सेंट्रींग प्लेट भाड्याने देणारे व्यावसायिक त्याच्या मागे लकडा लावत होते. यातूनच किरण तोंड लपवत फिरत होता अशी माहिती मिळाली आहे. यातच त्याने हा खून व लूट केल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT