Late Amol Vadgar
Late Amol Vadgar esakal
नाशिक

तरुणाची अनैतिक संबधातून हत्या; पोलिसांनी लावला 18 तासात छडा

संजीव निकम

नांदगाव (जि. नाशिक) : मंगळवारी (ता. २४) दुपारी नाग्या-साक्या धरणातील सांडव्याजवळ पाण्यात तरंगत असलेल्या तरुणाचा मृतदेह (Deadbody) आढळला. बावीस वर्षीय तरुणाचा हा मृतदेह नांदूर येथील अमोल धोंडीराम व्हडगर याचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. अठरा तासांच्या आत या खुनाचा (Murder Case) उलगडा करण्यास पोलिसांना यश आले. (Murder of young man from immoral relationship criminal arrested within 18 hours Nashik News)

सदर तरुणाची अनैतिक नैतिक (Immoral Relationship) संबंधातून हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज खरा ठरला. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली. बुधवारी सांयकाळी उशिरापर्यंत संशयितांना ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु होता. मंगळवारी दुपारी नाग्या-साक्या धरणातील सांडव्याजवळ मृतदेह तरंगत असतांना काही नागरिकांनी पाहिले. मृत अमोल व्हडगर रविवारी सायंकाळी घरातून गेलेला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. मृत अमोलच्या नातेवाईकांनी दोन दिवस शोध घेऊन मंगळवारी सकाळी हरवल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असता मंगळवारी दुपारी काही कॉलेजचे विद्यार्थी नाग्या-साक्या धरणाकडे फिरत असताना धरणाच्या सांडव्याजवळ हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह तरंगत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लागलीच पोलिसांना खबर दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस उपविभागीय अधिकारी समिरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे आदींनी भेट देत तपासाची चक्रे फिरवत खून झालेल्या तरुणाचे संशयिताच्या नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून मृत तरुणास वरातीतुन बोलवून त्याला मद्यपान करून त्याचा दोरीने गळा आवळून ठार करून नंतर त्याचे हात-पाय दोरीने बांधून धरणात फेकून पुरावा नष्ट करण्याच्या हेतून हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मृत व संशयित नांदूर येथील रहिवासी आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोल व्हडगर याचे संशयित गोविंदा वाळुबा केसकर, चैतन्य (सोनू) साहेबराव केसकर यांच्या नात्यातील महिलेशी जबरदस्तीने अनैतिक संबध ठेल्याच्या कारणावरून खून झाला आहे.

अमोल यास वेळोवेळी समज देऊन तो जुमानत नसल्याने रविवारी लग्नाच्या वरातीत संशयितांनी अमोलला बोलावून त्याला नाग्या-साक्या धरणाच्या बाजूला नेत मद्यपान करून संगनमताने त्याचा दोरीने गळा आवळून खून केला. नंतर त्याच दोरीने हात-पाय बांधून धरणात फेकले. दरम्यान सोमवारी अमोल घरी आला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शोध घेतला व बेपत्ता असल्याची पोलिसांत खबर दिली. मंगळवारी नाग्या-साक्या धरणात मृतदेह नागरिकांना दिसला. त्याची माहिती पोलिसांना कळाली. या घटनेचा नांदगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल केला. समीरसिंह साळवे, रामेश्वर गाढे, दिपक सुरडकर यांनी संशयितांना अटक करत खुनाचा तपास १८ तासांत लावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs PBKS : राजस्थान आज प्ले ऑफमध्ये जाणार की पंजाब देणार पराभवाचा धक्का... प्रीती झिंटाच्या संघाचा कर्णधार कोण?

RBI Monetary Policy: महागाईमुळे RBIची चिंता वाढली; तुमचा EMI कमी होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

माधवी राजे शिंदे काळाच्या पडद्याआड! केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य यांना मातृशोक, दिल्लीपासून मध्य प्रदेशात शोककळा

Nagpur Crime : कुलर कंपनीच्या मालकाची २० लाखांची फसवणूक ; व्यवस्थापकाने बनावट कुलर बनवून विकले

Praful Patel : जिरेटोपावरुन प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, अशी कोणतीही गोष्ट मनात...

SCROLL FOR NEXT