crime esakal
नाशिक

Nashik Crime News : डोंगराळे येथे तरुणाचा खून; 24 तासात उलगडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : डोंगराळे (ता. मालेगाव) येथील तरुणाचा खुनाचा उलगडा करण्यात मालेगाव पोलिसांना यश आले आहे. अवघ्या २४ तासात पोलिसांनी याप्रकरणातील दोघा संशयित यांना अटक केली.मंगळवारी (ता.६) ज्ञानेश्‍वर ऊर्फ आबा जनार्दन ह्याळीज (वय ३८) हा जंगलात जखमी अवस्थेत मिळून आला होता.(Murder of young man in Dongrale case solved in 24 hours nashik crime news )

ज्ञानेश्‍वर अत्यवस्थ स्थितीत मिळून आल्यानंतर त्यास नातेवाईक महादेव ह्याळीज यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले होते. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली.

मात्र त्याच्या मृत्यूबाबत संशय असल्याने तालुका पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवून जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र मगर, उपनिरीक्षक सुजित पाटील, हवालदार खांडेकर, पोलिस शिपाई बच्छाव, सचिन दळवी आदींनी कसोशीने तपास केला.

गुप्त बातमीदारांमार्फत या खुनाची चौकशी करीत भाऊसाहेब वसंत ह्याळीज (वय ३५) याला अटक केली. भाऊसाहेबची कसून चौकशी केल्यानंतर महेश रंगनाथ ह्याळीज (वय ३६, दोघे रा. डोंगराळे) याच्या मदतीने आपण ज्ञानेश्‍वर ऊर्फ आबाचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे सांगितले.

संशयित भाऊसाहेबचा मयत ज्ञानेश्‍वर हा चुलत भाऊ आहे. ज्ञानेश्‍वर हा सातत्याने भाऊसाहेब व त्यांच्या कुटुंबीयांवर दादागिरी करत होता. त्याची नजर संशयास्पद होती. अवमानास्पद वागणूक देणे, जाणूनबुजून त्रास यामुळे त्यांनी ज्ञानेश्‍वरचा काटा काढण्याचे ठरविले. त्यातूनच हा खूनाचा प्रकार घडला.

पोलिसांनी भाऊसाहेब व महेश या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT