Bhel Bhatta esakal
नाशिक

देवळ्यात भत्त्याची सत्ता; आठवडे बाजारात विक्रमी मागणी

मोठाभाऊ पगार

देवळा (जि. नाशिक) : ग्रामीण भागातील (Rural Area) सर्वांचा आवडणारा आणि खास करून बाजारातला खाऊ म्हणजे मुरमुऱ्यामध्ये (Murmura) शेव- दाळ्या- पापडी टाकून एकत्रित केलेला भत्ता. या भत्त्याचे मूल्य कमी असले तरी त्याची आठवडे बाजारातील विक्रमी विक्री चकित करणारी आहे. आठवडे बाजारातील या मुरमुऱ्याच्या भेळ- भत्त्याची आर्थिक उलाढाल तीन ते चार लाखांच्या पुढे होते. यामुळे भत्त्याची सत्ता टिकून आहे. (Murmura bhatta in demand in Weekly market Nashik News)

ग्रामीण भागात लहान- मोठे, गरीब- श्रीमंत असे सारेच शेव- दाळ्या- मुरमुऱ्याचा खाऊ आवडीने खातात. त्यामुळे आठवडे बाजाराच्या दिवशी जवळपास प्रत्येक पिशवीत हा खाऊ असतोच. ‘गरीबांचा खाऊ’ अशी उपाधी त्याला असली तरी त्याची विशिष्ट चव आणि पोटाची भूक थोडक्यात भागविण्यासाठी या खाऊला मोठी मागणी असते. जास्त मुरमुरे आणि त्यात शेव, तिखट चिवडा, पापडी, दाळ्या, शेंगदाणे, असे चविष्ट पदार्थ एकत्र करून हा भेळ- भत्ता बनतो. यासाठीचे मुरमुरे घोटी व इतर ठिकाणांहून मागवले जातात. इतर घटकांची रेसिपी मात्र प्रत्येक दुकानदाराची वेगळी चव सांगणारी असते. त्यामुळे ग्राहकांची आवड ठरत त्यांची पावले त्यात्या दुकानाकडे वळत असतात.

साधारणतः २० ते १०० रुपयांपर्यंत याची सर्वसाधारणपणे खरेदी केली जाते. प्रत्येक आठवडे बाजारात ही अशी पंधरा ते वीस दुकाने हमखास दिसून येतात. प्रत्येक दुकानात सरासरी बारा ते पंधरा हजारांपर्यंतचा व्यवसाय सहज होतो. देवळा येथे दर रविवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात हा शेव मुरमुऱ्याचा खाऊ घेणाऱ्यांची गर्दी प्रत्येक दुकानासमोर दिसून येते. इतर दिवशीही दाळ्या- मुरमुऱ्यांची दुकाने चालूच असतात. हंगामातील फळे तसा भाव खात असली तरी या भत्त्याची क्रेझ मात्र वर्षभर असते हे विशेष.

"बाजारातून इतर काहीही नेले तरी घरी सर्वांची मागणी शेव- मुरमुऱ्यांच्या भत्त्यालाच असते. त्यामुळे दर रविवारी किमान तीस ते पन्नास रुपयांचा भत्ता घ्यावाच लागतो. विशेष म्हणजे हा खाऊ सर्वांना पुरतो आणि सगळेच एकत्र बसून खातात याचा आनंद वेगळाच असतो."

- अनिल भामरे, खुंटेवाडी, ता. देवळा

"भत्ता म्हणजे खेड्या- पाड्यातील प्रत्येक घरातील आवडीचा खाऊ आहे. लहान- मोठे सारेच जण खात असल्याने यास मोठी मागणी असते. आठवडे बाजाराच्या दिवशी दिवसभर ग्राहकांची गर्दी असते. तेलाचे भाव वाढले असले तरी खाणारी व्यक्ती खुश व्हावी यासाठी शुद्धता व प्रमाण यासाठी आम्ही आग्रही असतो." - दिलीप मोरे, भत्ता व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: रोहित पालची स्पर्धा परीक्षेत उत्तुंग भरारी; राज्यात प्रथम, सहायक वनसंरक्षक पदावर होणार नियुक्ती

Kolhapur Cold Wave : दिवसा तीव्र चटका आणि रात्री वाढणारी थंडी; कोल्हापुरात विचित्र वातावरणाचा फटका, थंडी आणखी वाढणार

Traffic Jam: बोरघाटात प्रचंड वाहतूक कोंडी; अनेक तास अडकल्याने प्रवासी त्रस्त, पाच ते सहा किमी रांगा

DHURANDHAR COLLECTION: धुरंधरने केली बक्कळ कमाई! आतापर्यंतचं कलेक्शन वाचून थक्क व्हाल!

Truck Tempo Accident: पाथरी-पोखर्णी रस्त्यावरील अपघातात ट्रकचालक ठार; ट्रक टेंम्पो ट्रेलरची धडक, दोन तास वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT