Shivputra Sambhaji on the occasion of Dr. Officials of NAB felicitating Amol Kolhe. esakal
नाशिक

Shivputra Sambhaji Mahanatya : दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला इतिहासाचा अविस्मरणीय अनुभव!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शालेय पुस्तकातून वाचलेल्या इतिहासातील शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्याचा नॅब युनिट महाराष्ट्र संचलित भावना चांडक (फलोर) महाराष्ट्र नॅबच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. संभाजीराजांचे पात्र केलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह सर्वच कलाकारांच्या कलेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. (Nab Disabled students had unforgettable experience shivputra sambhaji mahanatya nashik news)

नाटकाचे संयोजक आणि नॅब संस्थेचे पदाधिकारी जयप्रकाश जातेगावकर यांनी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिवपुत्र संभाजीच्या महानाट्याचा अनुभव घ्यावा, अशी संकल्पना मांडली होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यास संमती दिली.

या दृष्टीने विद्यार्थ्यांनी घोड्याच्या टापाचे आवाज तसेच संभाजीराजे व इतर पात्रांनी त्यांच्या आवाजांच्या चढउतार यांच्या माध्यमातून साकारलेला इतिहास याचा अविस्मरणीय अनुभव घेतला. शेवटच्या दिवशीही नाशिककरानी प्रचंड गर्दी केली होती.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत नॅब संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, सचिव गोपी मयूर, शाळेच्या चेअरपर्सन मंगला कलंत्री, सहखजिनदार जयप्रकाश जातेगावकर, मुख्याध्यापिका वर्षा साळुंके, प्रशासकीय संचालक विनोद जाधव व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत

शेवटच्या दिवशी महानाट्य विद्यार्थ्यांना बघता यावे, या उद्देशाने आयोजकांनी विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के सवलत दिली होती. त्यामुळे या संधीचादेखील विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी या महानाट्याचा अनुभव घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 5th T20I: लखनौचा सामना 'धुक्यात' हरवला; आता भारत-दक्षिण आफ्रिका पाचवा सामना कधी व कुठे होणार, ते पाहा...

Nagpur News: डागा रुग्णालयात नवजात शिशूचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ, वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

Viral Video: 'अरे पैसा नही चाहिये', रेल्वे स्टेनशवरील बाप-लेकीची गोड व्हिडिओ व्हायरल

पिंजऱ्यात शिकार, जंगलात राज! वाघीण 'तारा'ची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दणक्यात एन्ट्री, शास्त्रीय पद्धतीने कशी राबवली 'सॉफ्ट रिलीज'?

Atal Bihari Vajpayee : राष्ट्रपतिपद स्वीकारण्यास वाजपेयींचा होता नकार; तत्कालीन माध्यम सल्लागार अशोक टंडन यांच्या पुस्तकात दावा

SCROLL FOR NEXT