Bank Director Vasant Gite while accepting the certificate from Election Officer Fayaz Mulani in the special meeting of Namco esakal
नाशिक

NAMCO News: ‘नामको’ला सोमवारी मिळणार नवीन अध्यक्ष; नवनिर्वाचित संचालकांना विजयी उमेदवार प्रमाणपत्राचे वितरण

बुधवारी (ता. २७) ‘नामको’च्या आवारात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी फयाज मुलाणी यांच्या हस्ते विजयी उमेदवार प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात, ‘नामको’च्या २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधीसाठी निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक येत्या सोमवारी (ता. १) होत असून, यातून नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

बुधवारी (ता. २७) ‘नामको’च्या आवारात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी फयाज मुलाणी यांच्या हस्ते विजयी उमेदवार प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. (NAMCO to get new president on Monday Distribution of winning candidate certificates to newly elected directors nashik)

नामको बँकेच्या सातपूर आयटीआय येथील प्रशासकीय कार्यालयात २४ नोव्हेंबरची विशेष तहकूब सभा बुधवारी सकाळी अकराला झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी फयाज मुलाणी होते.

सहाय्यक निवडणूक अधिकारी अरुण ढोमसे व राजीव इप्पर उपस्थित होते. सभेत निवडणूक अधिकारी मुलाणी यांनी झालेल्या निवडणूक प्रक्रियेचे वाचन करत निवडून आलेल्या संचालकांच्या नावांची घोषणा केली.

कोणत्याही अडथळाविना झालेल्या निवडणुकीत एका दिवसात मतमोजणी करण्याचा इतिहास रचला गेला. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव या वेळी झाला.

निवडून आलेल्या सर्वच नवनिर्वाचित २१ संचालकांना फयाज मुलाणी यांच्या हस्ते विजयी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

नवनिर्वाचित संचालक वसंत गिते, सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक, गणेश गिते, विजय साने, रंजन ठाकरे, अविनाश गोठी, महेंद्र बुरड, आकाश छाजेड, भानुदास चौधरी, हरीश लोढा, सुभाष नहार, देवेंद्र पटेल, ललीतकुमार मोदी, नरेंद्र पवार, प्रकाश दायमा, प्रफुल्ल संचेती, अशोक सोनजे, प्रशांत दिवे यांसह सभासद उपस्थित होते.

बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून नवनिर्वाचित संचालकांचा स्वागतवजा सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्राम दीक्षित, सरव्यवस्थापक त्रिगुण कुलकर्णी, डेप्युटी सरव्यवस्थापक अशोक पोळपाटील, बोर्ड विभागप्रमुख कल्पेश पारख आदी उपस्थित होते.

सकाळी सभा आटोपल्यानंतर लागलीच दुपारी बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड़णुकीचा कार्यक्रम मुलाणी यांनी घोषीत केला.

त्यानुसार १ जानेवारी २०२४ च्या बॅंकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा बॅंकेत सकाळी अकराला होणार आहे. यातून नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे बॅंकेला प्राप्त झालेल्या पत्रात म्हटले आहे.

हालचाली सुरू

अध्यक्ष, उपाध्यक्षांचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर पॅनलकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. पॅनलचे नेते वसंत गिते, सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक, विजय साने यांच्या नावाची चर्चा अध्यक्षपदासाठी आहे.

गतपंचवार्षिकमध्ये नेत्यांना संधी मिळालेली असल्याने दुसऱ्यांदा निवडून आलेल्यांना संधी मिळावी, अशी मागणी सुरू झाल्याची चर्चा आहे. उपाध्यक्षपदासाठी नवीन चेहरे दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT