The work of the new bridge in the Lendi river bed in the city. So the water channel that is laid as an alternative to the burst main water channel esakal
नाशिक

Nashik Water Crisis: नांदगावला पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य! 15 दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प

नांदगाव शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : शहरासह सतरा गावांचा खंडित झालेला पाणीपुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर होणारे काम रेंगाळत चालल्याने आणि ५६ खेडी नळयोजनेतून सलग पंधराव्या दिवशीही पाण्याचे वितरण होऊ न शकल्याने नांदगावला पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य झाले आहे.

ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत असल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणण्याची वेळ नांदगावकरांवर आलेली आहे. (Nandgaon drinking water shortage supply stopped for 15 days Nashik News)

नांदगाव शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. याच दरम्यान लेंडी नदीपात्रात नव्या पुलाचे काम सुरु असताना शहराला पाणीपुरवठा करणारी चारशे एमएमची मुख्य जलवाहिनी फुटल्याने पंधरा दिवसापासून शहरासह सतरा गावाचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.

गेल्या काही दिवसापूर्वीच रेल्वेच्या तिसऱ्या मार्गिकेच्या कामातही ५६ खेडी योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली व पाणी पुरवठा विस्कळित झाला होता एकूणच विस्कळित पाणी वितरणाचा हा सलग दुसरा महिना असून ऐन थंडीच्या दिवसात पाण्याच्या या कृत्रिम टंचाईने गृहिणींचे मात्र गणित कोलमडून पडले आहे.

मटण मार्केट जवळ लेंडी नदीपात्रात नव्या पुलाच्या कामाला प्रारंभ झाला. या पुलाजवळ नदीपात्रात शहर व ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या वेगवेगळ्या नळयोजनांच्या जलवाहिन्या असल्याने त्यातील चारशे एमएमची मुख्य जलवाहिनी पंधरा दिवसापूर्वीच फुटली.

जुन्या योजनेच्या जलवाहिनीच्या गळतीमुळे अगोदरच ५६ खेडी नळयोजना वादग्रस्त बनली असताना आता त्याला नव्या पुलाच्या पायाभरणीच्या कामाचे निमित्त कारणीभूत ठरले आहे.

शहराला पाणी पुरवठा करणारे दहेगाव धरणाने तळ गाठल्याने सध्या माणिकपुंज धरणातून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

मात्र प्रामुख्याने मदार असलेल्या गिरणा धरणावरील ५६ खेडी नळयोजनेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने त्याच्या दुरुस्तीकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

सांयकाळी उशिरा पावेतो दोन्ही पाइपच्या रिंगच्या वेल्डिंगचे काम सुरु होते. त्यानंतर सिमेंट- कॉंक्रिट होऊन खंडित झालेला पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.

काम धिम्या गतीने

ज्याठिकाणी मुख्य जलवाहिनी फुटली आहे. त्याठिकाणी नवीन लोखंडी जलवाहिनी टाकण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरवात होणे अपेक्षित असताना त्याकामात देखील चालढकल होत आहे.

कधी वेल्डिंग नाही कधी दोन पाइप जोडणाऱ्या रिंग नसणे अशा सबबीमुळे कामाला विलंब होत आहे. यातच फुटलेला पाइप जोडण्यासाठी नदीपात्रात असलेला गाळाचा उपसा करण्यासाठी लावलेली मोटार नादुरुस्त होणे अथवा खराब होणे अशा अडचणींचा सामना या दरम्यान करावा लागला आहे.

याचा परिणाम योजनेच्या आवर्तन व्यवस्थेतील वितरणाच्या वेळापत्रकावर झाला आहे. त्यामुळे नांदगाव शहर व आजूबाजूच्या गंगाधरी, श्रीरामनगर, गिरणानगर, डॉक्टरवाडी, हिसवळ बुद्रूक आदी ग्रामीण भागातील सतरा गावांचा पाणीपुरवठा विस्कळित झाला.

‘एक ना धड भाराभर चिंध्या’

मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरात पाण्याअभावी आणीबाणी होवू नये म्हणून पालिका प्रशासनातर्फे माणिकपुंज धरणातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु यातून केवळ शहराच्या काही भागांना पाणी पुरवठा करण्यात आला.

मात्र यातून पर्यायी व्यवस्थेतून गिरणा नळयोजनेसारखा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था शहरासह आजूबाजूच्या सतरा गावांची झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT