mission bhagirathi esakal
नाशिक

Nashik Mission Bhagirathi : ‘मिशन भागीरथी प्रयास’ मध्ये नांदगाव तालुका उत्कृष्ट

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यातील दुष्काळी गावांचे रूपडे बदलण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा टॅंकरमुक्त करण्याचा संकल्प करत ‘मिशन भगीरथी प्रयास’ हाती घेतले आहे. (Nandgaon taluka excels in Mission Bhagirathi Prayas nashik news)

या मिशन अंतर्गत जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमधील पाणीटंचाई असलेल्या दुष्काळी गावांमध्ये २० ते २५ सिमेंट बंधारे बांधली जाणार आहेत. या मिशन अंतर्गत नांदगाव तालुक्यातील गावांमध्ये साखळी बंधाऱ्यांची कामे सर्वात आधी प्रगतिपथावर असल्याने आशिमा मित्तल यांच्याकडून या कामाबद्दल गौरव करण्यात आला.

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे व उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, यांच्या कल्पनेतून ‘जल समृद्ध गाव’, आणि ‘समृद्ध शेतकरी’ या ध्येयावर आधारित नावीन्यपूर्ण उपक्रम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत राबविले जात आहे. यात उपक्रमांतर्गत तालुक्यांतील पाणी टंचाई दूर करण्याच्या उद्देशाने आणि जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी ‘मिशन भगीरथ प्रयास उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या उपक्रमांच्या अनुषंगाने नांदगाव तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आलेली आहे. त्यापैकी कसाबखेडा ग्रामपंचायत अंतर्गत पोही गावाचा यात समावेश करण्यात आलेला आहे. पोही गावाची लोकसंख्या ७४३ असून २६४ कुटुंब संख्या आहे. सदर उपक्रमाअंतर्गत ‘मिशन भगीरथ मोहीम’ आखून पोही गावात साखळी पद्धतीने एकूण १० सिमेंट बंधारे करण्याचे प्रस्तावित आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यानुसार शाखा अभियंता लघुपाट बंधारे, उपविभाग मालेगाव यांनी स्थळ पाहणी करून अंदाजपत्रक उपलब्ध करून दिले. त्यानुसार प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश प्राप्त करून काम सुरू करण्यात आले.

प्रस्तावित १० बंधाऱ्यापैकी एक बंधारा बांधून पूर्णही करण्यात आला आहे. सदर बंधाऱ्याची पाणी साठवणूक क्षमता ०.४६ दशलक्ष घनफूट आहे. सदर बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला वनविभागाचे क्षेत्र असून डोंगररांग आहे. पावसाळ्यात डोंगरावरील पाणी बंधाऱ्यात अडविले जाईल. त्याने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना फायदा होईल तसेच भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

"मिशन भागीरथी प्रयास अंतर्गत नांदगाव तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे. या गावात ४८ साखळी बंधारे बांधण्याचे नियोजन केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर पोही व परधाडी या दोन गावातील काम पूर्ण झाले आहे. यामुळे पावसाचे अडविले जाईल आणि गावाचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे." - गणेश चौधरी, गटविकास अधिकारी नांदगाव

"सदर कामासाठी वेळोवेळी तालुक्याचे गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. ही कामे योग्यरीत्या पूर्ण झाल्याने आमचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार आहे. याबद्दल गावातील सर्व शेतकऱ्यांच्यावतीने जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार." -सुनीता चव्हाण, सरपंच कसाबखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघर साधू हत्याकांडाचे आधी आरोप केले, आता पक्षात का घेतलं? CM फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, भाजपकडून प्रवेशाला स्थगिती

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

CM Devendra Fadnavis: मित्रपक्षांना शत्रू समजू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, युती म्हणून एकत्र लढणार

Kolhapur News: कुरुंदवाडच्या रणांगणात कलाटणी! ठाकरे गट शाहू आघाडीसोबत; काँग्रेस ‘एकाकी’

Video Viral: वाहत्या पुरात हरीणाला हत्तीनं दिलं जीवनदान, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT