Nandurmadheshwar Bird Sanctuary will be closed for tourists 
नाशिक

 पर्यटकांचा हिरमोड! नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्य तूर्तास तरी बंदच

महेंद्र महाजन

नाशिक : देशातील पर्यटनाला हिरवा कंदील मिळाला आहे. तरीही नाशिकमधील कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता, तूर्ततरी नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करणे शक्य नाही. वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांची परवानगी मिळाल्यावर पक्षी अभयारण्य खुले करण्यात येईल, असे वन्यजीव वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी सांगितले. 

वन्यजीव पर्यटनाला देशात आजपासून सुरु होत आहे. वन्यजीव सप्ताहामध्ये वन्यजीव पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. मात्र महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्येचा विचार करता, निवडक अभयारण्य वगळता इतर अभयारण्य बंद राहणार आहेत. आजपासून चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुरु झाला असल्याने पक्षी अभयारण्य देखील सुरु होईल, अशी अपेक्षा पर्यटक व्यक्त करत होते. प्रत्यक्षात मात्र रुग्ण संख्या पाहता, पक्षी अभयारण्य सध्याच्या परिस्थितीत सुरु करणे अवघड आहे. सध्याच्या परिस्थितीत अभयारण्य खुले करायचे म्हटल्यास अगोदर मोठी तयारी करावी लागणार आहे. पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना तयार कराव्या लागतील. सोशल मीडियातून ताडोबा सफारीमध्ये दर्शन देणाऱया वाघांची छायाचित्रे व्हायरल झाल्याने अभयारण्याबद्दलची माहिती वन्यजीव विभागाकडून घेण्यात आली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांचे (महाबळेश्वर, भीमाशंकर आणि एलिफंटा सोडून) पूर्णपणे ऑनलाइन आरक्षण सुरू करण्यात आले आहे. 

 
 संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Crash : सोनं-चांदी स्वस्त झालं की गुंतवणूक बुडाली? 24 दिवसांत किमतीत तब्बल 60 हजारांची घसरण; काय घडतंय बाजारात? गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

SCROLL FOR NEXT