narendra modi Mahant of Nashik offering copper plate to Prime Minister news esakal
नाशिक

Narendra Modi : नाशिकच्या महंतांकडून पंतप्रधानांना ताम्रपत्र! 100 श्‍लोक कोरलेला ‘मोदी शतकम’ ताम्रपट

सकाळ वृत्तसेवा

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची संस्कृती आंतरराष्ट्रीय पातळीवर नेल्याने येथील महंत स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे आणि साहित्यचार्य यतीशचंद्र मिश्रा यांनी मोदींच्या यशस्वी कारकीर्दीवर १०० श्‍लोक ताम्रपटावर कोरून तो ताम्रपट मंगळवारी (ता. ८) पंतप्रधान मोदींना अर्पण केला.

ताम्रपटाला ‘मोदी शतकम‍’ असे नाव देण्यात आले आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली आज महंतांनी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकला संस्कृत विश्वविद्यालय उभारावे, काशीच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर येथे कॉरिडॉर व्हावा आदी मागण्या मांडल्या. (narendra modi Mahant of Nashik offering copper plate to Prime Minister news)

खासदार गोडसेंच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महंत अनिकेतशास्त्री देशपांडे, साहित्यचार्य यतीशचंद्र मिश्रा, शैलेंद्र उदावंत, पंकज मिश्रा आदींनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली. महंत अनिकेतशास्त्री, यतीशचंद्र मिश्रा यांनी पंतप्रधानांच्या यशस्वी कारकीर्दीवर रचलेले १०० श्‍लोक कोरलेला ताम्रपट दिला.

लॉकडाउनच्या काळात वर्षभरात १०० श्‍लोक रचलेले आहेत. नाशिकमधील सुजित जोशी, दीपेश देशपांडे आणि मिलिंद फडके या कलाकारांनी दीड महिना श्‍लोक ताम्रपटावर कोरण्याचे काम केले. श्‍लोक कोरलेला ताम्रपट तीन फूट बाय सव्वादोन फूट इतक्या आकाराचा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर

ताम्रपट भेट दिल्यावर खासदार गोडसे यांनी सिंहस्थाविषयी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करीत तीन वर्षांनंतर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष सोयी-सुविधांचे नियोजन आणि त्या संदर्भातील कामांना आतापासूनच प्रारंभ होणे गरजेचे असल्याचे पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले.

काशी विश्वनाथ आणि उज्जैन महांकालेश्वरच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर येथे कॉरिडॉर व्हावा, नाशिक येथे संस्कृत विश्वविद्यापीठ उभारण्यात यावे, तसेच भारतातील सर्वच मठ आणि आखाड्यांमध्ये महिला साध्वींसाठी स्वतंत्र साध्वी भवनाची निर्मिती करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन दिले. मागण्यांबाबत समर्पक भावनेतून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचे गोडसे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT