Governor Bhagat Singh Koshyari with Narhari Zirwal
Governor Bhagat Singh Koshyari with Narhari Zirwal esakal
नाशिक

बंडखोरांवरील कारवाईच्या निर्णयाच्या केंद्रस्थानी दिंडोरी

महेंद्र महाजन

नाशिक : शिवसेनेतील बंडखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांना बजावलेली नोटीस अन् बाजू मांडायला दिलेली मुदत या साऱ्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या केंद्रस्थानी दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघ आला आहे. विशेष म्हणजे, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमधील विळ्या-भोपळ्याचे सख्य राहिलेला नाशिक जिल्ह्यातील हा मतदारसंघ असून, आदिवासीबहुल या भागातून विधानसभेत तिसऱ्यांदा प्रतिनिधी करणारे आहेत विधानसभेचे उपाध्यक्ष (Deputy Speaker of the Legislative Assembly) नरहरी झिरवाळ(Narhari Jirwal). (Narhari zirwal, Deputy Speaker of the Legislative Assembly is the 3rd representative from this tribal dominated area nashik news)

सध्याच्या राजकीय पेचाच्या अनुषंगाने श्री. झिरवाळ यांच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मुळातच, श्री. झिरवाळ हे चर्चेत आले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार यांच्या समर्थनार्थ ‘नॉट रिचेबल’ झालेल्या आमदारांमध्ये असलेल्या समावेशामुळे. हरियानातील गुडगामधील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या चार आमदारांमध्ये श्री. झिरवाळ यांचा समावेश होता.

त्या वेळी पायजमा, गांधीटोपी परिधान करणारे श्री. झिरवाळ यांनी पॅन्ट-इन शर्ट आणि मागे वळविण्यात आलेले केस, विनाचष्मा असे वेशांतर करत त्यांना हॉटेलमध्ये बाहेर काढण्याचे कसब राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साधले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महाविकास आघाडीमध्ये श्री. झिरवाळ यांच्याकडे थेट विधानसभेचे उपाध्यक्षपद सोपविण्याचा निर्णय झाला अन् साऱ्या तर्कवितर्कांवर पडदा पडला होता.

दिंडोरी-पेठचे राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी संधी दिल्याने श्री. झिरवाळ यांचा प्रवास दिंडोरी पंचायत समिती, नाशिक जिल्हा परिषदेमार्गे विधानसभेत पोचला. २००४ मधील निवडणुकीत श्री. झिरवाळ हे विजयी झाले. त्यानंतर बारामती म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असा प्रचार झाला असताना श्री. झिरवाळ यांना लोकसभेसाठी संधी दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. २००९ मधील निवडणुकीत (कै.) माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे चिरंजीव धनराज महाले यांनी तेव्हा शिवसेनेचे उमेदवार म्हणून श्री. झिरवाळ यांचा पराभव केला होता.

मात्र श्री. झिरवाळ यांनी विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत पराभवाची परतफेड केली. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी सोडून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री झालेल्या डॉ. भारती पवार यांच्यामुळे श्री. महाले यांनी पक्षांतर करत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी केली. मात्र श्री. महाले यांचा पराभव झाला. विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीच्या तोंडावर श्री. महाले हे स्वगृही शिवसेनेत पोचले. विधानसभा उमेदवारांच्या यादीत शिवसेनेने श्री. महाले यांना दिंडोरी-पेठमधून संधी दिली.

मात्र स्थानिक माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या टोकाच्या विरोधामुळे श्री. महाले यांची उमेदवारी कापली गेली आणि पेठचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्करराव गावित यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. उमेदवारीच्या या बदलामध्ये शिवसेना ‘बॅकफूट’वर गेली आणि श्री. झिरवाळ यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर ६० हजारांहून अधिक मतांनी बाजी मारली. दिंडोरीमध्ये श्री. शेटे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना लढत राहिली.

ग्रामपंचायत, विकास सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कादवा सहकारी साखर कारखाना, दिंडोरी नगर परिषद अशा ठिकाणी राष्ट्रवादी-शिवसेनेत टोकाचा संघर्ष राहिला. गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीत श्री. झिरवाळ आणि श्री. चारोस्कर यांनी एकत्र येत दिंडोरीमध्ये, तर पेठमध्ये श्री. झिरवाळ यांच्या चिरंजीवाने बाजी मारली. श्री. झिरवाळ यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांवर रोजंदारी केली.

सरकारी कार्यालयात काही दिवस नोकरी केल्यावर ते राजकारणात उतरले आहेत. आदिवासींच्या पारंपरिक कलांमध्ये श्री. झिरवाळ यांना विशेष रस असून, ते कीर्तनात रमतात. अजूनही ते शेतात स्वतः राबतात. प्रत्येक रविवारी त्यांचा जनता दरबार भरलेला असतो. अशा या श्री. झिरवाळ यांच्याकडे असलेल्या बंडखोरीच्या निर्णयाच्या भवितव्याकडे अवघ्या राज्याच्या नजरा खिळल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT