Shiv Sena esakal
नाशिक

Nashik News : पती योग्यच निर्णय घेतील ना...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पाथर्डी फाटा येथील प्रभाग क्रमांक ३१ मधील शिवसेनेच्या नगरसेविका संगीता जाधव यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला.

मात्र ज्या दिवशी प्रवेश करायचा त्या दिवशी पहाटे त्यांचे पती तथा माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी याबाबत माहिती दिल्याचा खुलासा नुकताच त्यांनी केला.

शिंदे गटाचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि सहसंपर्क प्रमुख राजू लवटे यांच्या स्वागतासाठी पाथर्डी फाटा येथे कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी सौ. जाधव भाषणात म्हणाल्या, की त्यादिवशी प्रवेश करण्यासाठी कोण कोण गेले याची चौकशी मी करत होते. (Naro Shankarachi Ghanta Sakal Special Crime Comedy tragedy Nashik News)

प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

पहाटे मात्र मला अमोल जाधव यांनी सांगितले, की चल आपल्याला शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी निघायचे आहे. तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्या क्षणापर्यंत याविषयी घरात चर्चा देखील झाली नव्हती.

परंतु पती जर हा निर्णय घेत असतील तर तो योग्यच असेल असा विचार करून त्यांच्यासोबत निघाले आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल झाले. हा खुलासा त्यांनी केल्यानंतर मात्र व्यासपीठावरील आणि समोर उपस्थित असलेल्या सर्वांचीच चांगली करमणूक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT