politics esakal
नाशिक

नारोशंकराची घंटा : राजकारणातील अशी ही दोस्ती

सकाळ वृत्तसेवा

राजकारणात कोण कधी कुणाचा गेम करेल, हे सांगता येत नाही. सकाळ, दुपार, सांयकाळ एकाच ताटात जेवण करून मित्रत्वाच्या आणाभाका घेणारे जेव्हा राजकारणाच्या सत्तेच्या पटलावर एकत्र येतात, त्या वेळी हे सर्व विसरून एकमेकांना खाऊ की सोडू, असे करतात. (Naroshankarachi ghanta friendship in politics comedy sakal special nashik news)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

याचाच प्रत्यय एका राजकारणातल्या जोडगोळीला काही दिवसांपूर्वी आला. महापालिकेच्या निवडणुका कधी होईल, हे सांगता येत नाही. मात्र निवडणुकीची तयारी प्रत्येकाकडून सुरू आहे. उमेदवारीसाठी मोठ्या नेत्यांकडे फिल्डिंग लावली जात आहे.

असेच एका नेत्याकडे मित्रासाठी फिल्डिंग लावण्यासाठी एकजण गेला. राजकारणाची बोलणी झाल्यावर नेत्याने फिरकी घेत मित्रासाठी उमेदवारी मागण्यासाठी गेलेल्या त्या एका मित्रालाच ‘तूच का नाही त्या जागेवर उभा राहत’, अशी गुगली टाकून चारीमुंड्या चीत केले. नेत्याचा प्रस्ताव ऐकून तत्काळ होकार तर दिला.

मित्राला मात्र बैठकीचा रिझल्ट सांगताना भाऊंनी तुझ्या नावाला होकार दिला खरा. मात्र पत्रके माझ्या नावाची वाटण्यास लावली, असे उत्तर देताच संतापलेल्या मित्राने समोरच्याच्या कुटुंबाचा उद्धार करत तुलाच कसा राजकारणातून साफ करतो, अशी धमकी देत मैत्री तुटल्याचे जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

Mumbai Indians च्या संघाने नवीन प्रशिक्षक जाहीर केला; २०१० पासून संघासोबत असलेल्या खेळाडूला केले बाय बाय...

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा भाजपवर आरोप; “मतचोरीच्या मुद्द्यावरून माघार घेणार नाही”

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT