11th Admission esakal
नाशिक

Nashik 11th Admission : अकरावी प्रवेशासाठी 22 हजार विद्यार्थ्यांचे नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik 11th Admission : अकरावीच्‍या प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत नोंदणी करून अर्जाचा भाग एक भरण्याची वाढीव मुदत बुधवारी (ता. १४) संपली. त्‍यानुसार २२ हजार ०४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. (Nashik 11th Admission Registration of 22 thousand students news)

तर यापैकी १४ हजार ०४८ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन भरला असून, एक हजार ३७३ विद्यार्थ्यांनी कोट्यांतर्गत जागांसाठी प्रवेश अर्ज दाखल केला आहे. अर्जाचा भाग दोन भरण्याची अंतिम मुदत शनिवारी (ता. १७) पर्यंत आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रातील ६४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उपलब्‍ध असलेल्‍या २३ हजाराहून अधिक जागांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याअंतर्गत पहिल्‍या नियमित फेरीत सहभागासाठी अर्जाचा भाग एक भरण्याकरिता बुधवारपर्यंत मुदत दिलेली होती.

या मुदतीत नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी अर्जाचे प्रमाणिकरण करून घ्यायचे होते. या वाढीव मुदतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, १९ हजार विद्यार्थ्यांनी आपले अर्ज लॉक केलेले आहेत. सध्या अर्जाचा भाग दोन भरण्याची मुदत उपलब्‍ध आहे. वाढीव मुदतीत सुमारे १७ ते १८ हजार विद्यार्थी प्रवेश फेरीत सहभागी होण्याची शक्‍यता वर्तविली जाते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT