11th Admission (file photo) esakal
नाशिक

Nashik 11th Admission : अकरावी प्रवेशासाठी 24 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी; गुरुवारी निवड यादी होणार प्रसिद्ध

11th Admission : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठीच्‍या ऑनलाइन केंद्रीभूत प्रक्रियेसाठी नोंदणी प्रक्रियेची मुदत संपलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik 11th Admission : येथील महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठीच्‍या ऑनलाइन केंद्रीभूत प्रक्रियेसाठी नोंदणी प्रक्रियेची मुदत संपलेली आहे. २७ हजारांहून अधिक जागा उपलब्‍ध असताना, प्रत्‍यक्षात निर्धारित मुदतीत २३ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. दरम्‍यान, पहिल्‍या फेरीसाठी गुरुवारी (ता. २७) निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. (24 thousand students for eleventh admission will be published on Thursday)

नाशिक शहरातील ६८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये अकरावी प्रवेशासाठी प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्‍या नियमित फेरीसाठी अर्जाचा भाग एक व भाग दोन भरल्यावर गुणवत्ता यादी प्रसिद्धीची प्रक्रिया पार पडली. आता पात्रताधारक विद्यार्थ्यांमधून पहिल्‍या नियमित फेरीत विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. (latest marathi news)

शनिवार (ता. २२) ते बुधवार (ता. २६) हा कालावधी शिक्षण विभागाने माहितीचे विश्‍लेषण करण्यासाठी राखीव ठेवला. विद्यार्थ्यांनी नोंदविलेला पसंतीक्रम व त्‍यांना मिळालेले गुण या आधारावर माहितीचे विश्‍लेषण करून निवड यादी तयारी केली जाणार आहे. ही यादी गुरुवारी (ता. २७) प्रसिद्ध केली जाईल. यादीत निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १ जुलैपर्यंत मुदत दिली जाणार आहे.

पुढील फेऱ्यांचे असे आहे नियोजन

पहिली नियमित फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यावर आणखी दोन अशा एकूण तीन नियमित फेऱ्या राबविल्‍या जातील. यापैकी दुसरी नियमित फेरी ३ ते १० जुलै या कालावधीत, तर तिसरी नियमित फेरी ११ ते १९ जुलै या कालावधीत राबविली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चित्रपट बंद पाडण्याचे खूप प्रयत्न... 'रणपती शिवराय स्वारी आग्रा'बद्दल बोलताना अजय पुरकर संतापले; आव्हान देत म्हणाले- अजूनही...

Delhi-Mumbai Expressway Accident VIDEO : काळ आला होता, पण..! दिल्ली-मुंबई महामार्गावर भरधाव कार ५० मीटरपर्यंत उलटली तरीही सर्वजण सुखरूप

Vijay Hazare Trophy: मुंबईचा रोमांचक विजय, पण महाराष्ट्र-विदर्भ पराभूत; सूर्यकुमार, जैस्वाल अपयशी, तर श्रेयस, रिंकू सिंग चमकले

Congress Leader Attack: अकोल्यात काँग्रेस नेत्यावर हल्ला; भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी दाखल आहे गुन्हा

ECI notice to Mohammed Shami: मोहम्मद शमीला निवडणूक आयोगाची नोटीस!, जाणून घ्या, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT