Accidental bus fell into valley at Saputara. esakal
नाशिक

Nashik Bus Accident : बस दरीत कोसळून 2 मुलांचा मृत्यू! सापुतारा घाटात अपघात; जखमींना रुग्णालयात हलवले

Nashik News : सापुतारा घाट मार्ग दिवसेंदिवस खडतर होत असून रविवारी (ता.७) आणखी एक अपघात होऊन खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस दरीत कोसळून दोन मुलांचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

सुरगाणा/सापुतारा : सापुतारा घाट मार्ग दिवसेंदिवस खडतर होत असून रविवारी (ता.७) आणखी एक अपघात होऊन खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस दरीत कोसळून दोन मुलांचा मृत्यू झाला. तर ५८ प्रवासी जखमी झाले आहेत. सुरतच्या बापा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस ६० प्रवाशांना घेऊन परतत होती. (2 children died after bus fell into valley)

दरम्यान, सापुतारा घाट रस्त्यावर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने लक्झरी बस खोल दरीत कोसळली. वीरा जवळून गेल्यावर लोक मदतीसाठी धावले. दरम्यान, १०८ चे पथकही घटनास्थळी पोचले. जखमींना रुग्णालयात हलवले.

चौक बाजार-उधना, सुरत येथील प्रवाशांची बापा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस क्र. (जीजे ०५ बी. टी. ९३९३) रविवारी सापुतारा येथे गेलेल्या प्रवाशांना घेऊन सापुतारा-मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरून जात होती. सायंकाळी सहाच्या सुमारास वळण घेताना लक्झरी बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि बस संरक्षण भिंतीला धडकून दरीत कोसळली. (latest marathi news)

लक्झरी बसच्या चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या लक्झरी बसमध्ये अंदाजे ६० प्रवासी होते. अपघात होताच सापुताराकडे आलेल्या इतर पर्यटकांनी वाहने थांबवून मदतीसाठी धाव घेतली.

ही घटना समजताच सापुताराचे पोलिस निरीक्षक भोया कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोचले. दरम्यान, जखमींना शामगव्हाण सीएचसीमध्ये हलवले आहे. याप्रकरणी सापुतारा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT