india post esakal
नाशिक

Malegaon Postal Department : वर्षात मालेगाव टपाल विभागाला 30 कोटीचे उत्पन्न! डिजिटल युगातही पोस्टाचे महत्त्व

Latest Nashik News : मालेगाव विभागीय कार्यालय अंतर्गत सटाणा, कळवण, देवळा, चांदवड, मालेगाव, नांदगाव, निफाड या सात तालुक्यात ३५३ टपाल कार्यालय आहेत. यात ग्रामीण ३३८ तर शहरी भागात १५ आहेत.

जलील शेख

मालेगाव : काही वर्षात झपाट्याने डिजिटल क्रांती झाली. २०१६ मध्ये मोफत डेटा मिळाला. दोन वर्षात सामान्य कुटुंबात देखील स्मार्ट फोन आले. पत्राची जागा मेसेजने घेतली. तरीदेखील डिजिटल युगात महत्त्व कमी झाले नाही. बाजारात अनेक ई कॉमर्स कंपन्या आल्या. पण ग्रामीण भागात मात्र आजही सेवा देणारे एकमेव टपाल खाते आहे. मालेगाव विभागीय कार्यालयाने एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत या वर्षात सुमारे ३० कोटीचे उत्पन्न मिळविले. (30 crore income to Malegaon Postal Department in year)

मालेगाव विभागीय कार्यालय अंतर्गत सटाणा, कळवण, देवळा, चांदवड, मालेगाव, नांदगाव, निफाड या सात तालुक्यात ३५३ टपाल कार्यालय आहेत. यात ग्रामीण ३३८ तर शहरी भागात १५ आहेत. या कार्यालयातून रजिस्टर, स्पीड, साधे पोष्ट, प्रिंटेड, बिझनेस यासह अनेक सुविधा ग्राहकांना मिळत असल्याने नागरिकांचा कल वाढत आहे. इतर ई कॉमर्स कंपन्यांच्या तुलनेत कमी खर्चात पार्सल पोहोचते.

विभागीय कार्यालय अंतर्गत वर्षभरात रजिस्टर ४.३४ लाख तर स्पीड पोष्ट ८ लाख १ हजार २४५ इतर पार्सल ३८ हजार ६४२ वितरीत करण्यात आले. आठ तालुक्यात १ हजार ८९ टपाल पेट्या आहेत. १८४ बॉक्स पोष्टाने ठेवले आहेत. टपाल वाटपासाठी ७३५ कर्मचारी आहेत. (latest marathi news)

यात सर्वात जास्त ग्रामीण डाक सेवा कर्मचारी आहेत. मालेगाव येथून आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा देखील दिली जात आहे. यात दुबई,अमेरिका,चीन यासह अनेक देशात सेवा दिली जाते. लाडकी बहीण योजना आल्यापासून टपाल बॅकेकडे कल वाढत आहे.

"शहर व ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांमार्फत वेळेत सेवा दिल्या जातात. पार्सल सुविधा देणाऱ्या कंपन्या पेक्षा पोष्टात कमी दरात सवलती मिळतात. परदेशातही सेवा भारतीयांना मिळत असल्यामुळे परदेशातही विश्‍वासार्हता पोष्टाने जपली आहे. रक्षाबंधन, दिवाळी यासह अनेक सणांमध्ये पोष्टातर्फे सेवा दिली जात आहे."- भरत पगार (डाकघर अधिक्षक, मालेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Murlidhar Mohol : राजू शेट्टी नुरा कुस्ती खेळताहेत, धंगेकर बिळातील उंदीर; जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोपावर मोहोळ यांचं प्रत्युत्तर

"हा सिनेमा सिक्वेल नाही" पुन्हा शिवाजीराजे सिनेमाच्या वादावर महेश मांजरेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले..

Latest Marathi News Live Update : मुरलीधर मोहोळ हे हतबल- रवींद्र धंगेकरांचा पलटवारक

शेतकऱ्यांची दिवाळी गाेड! 'अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८४६ कोटींची मदत'; नेमकी किती जणांना मिळाली मदत?

साेलापूर हादरलं! 'डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून युवकाचा निर्घृण खून'; गरिबी हटाव झोपडपट्टी क्र. एकमधील घटना..

SCROLL FOR NEXT