Home Buying esakal
नाशिक

Nashik News : शहरात 30 टक्के घरांच्या मागणीत वाढ; परवडणाऱ्या घरांकडे कल

Nashik : महापालिका हद्दीमध्ये घरांच्या मागणीत जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिका हद्दीमध्ये घरांच्या मागणीत जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी गुढीपाडवा या नववर्षाच्या मुहूर्तावर घरे खरेदी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडे मागणी वाढली आहे. मुंबई व पुणे या मेट्रो शहरांमध्ये विस्ताराला मर्यादा आल्या आहेत. त्याचबरोबर पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण पडत असल्याने या दोन्ही शहरांच्या मध्यभागी असलेल्या नाशिकमध्ये घर खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. (Nashik 30 percent rise in housing demand in city marathi news)

समृद्धी महामार्गाचे दोन टप्प्यात उद्‌घाटन झाले आहे. इगतपुरी ते मुंबई या शेवटच्या टप्प्याचे उद्‌घाटन थोड्याच दिवसात होणार आहे. परिणामी पर्यटनासाठी नाशिकचे अंतर जवळ आले आहे. त्याचबरोबर सुरत- चेन्नई ग्रीन फील्डचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचा परिणाम हा गुजरातमधून नाशिकमध्ये गुंतवणुकीकडे वाढला आहे. त्याचबरोबर सुरत व दक्षिण भारतात महामार्गाने जोडताना नाशिक हे महत्त्वाचे व मोठे शहर असल्याने त्याचबरोबर मुंबई व पुणे तसेच औरंगाबाद या शहराचे अंतर जवळ असल्याने नाशिकमध्ये घर घेण्याकडे कल आहे. (latest marathi news)

त्याचा परिणाम सध्याच्या मौसममध्ये दिसून येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेचा अंदाज घेतला असता जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. घर खरेदी करताना परवडणाऱ्या घरांकडे अधिक कल आहे. साधारण २५ ते ३० लाख किमतीची घरे हातोहात विकली जात आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहर पुन्हा एकदा गृह खरेदीचा मुहूर्त साध्य करण्यासाठी सज्ज झाले आहे. गुढीपाडव्या बरोबरच पुढील दहा दिवस खरेदीचा मौसम कायम राहणार आहे.

''बांधकाम व्यवसायिकांच्या क्रेडाई संस्थेतर्फे शहरात पाच ठिकाणी एक्झिबिशन सुरू आहे, त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने त्यातून घरांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येते.''- कृणाल पाटील, अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक मेट्रो.

''२५ ते ३० टक्क्यांनी घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. परवडणारी घरे खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा कल दिसून येतो.''- सुनील गवादे, अध्यक्ष, नरेडको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT