Nashik Grapes Export
Nashik Grapes Export esakal
नाशिक

Nashik Grapes Export : दुष्काळ असूनही 32 कोटींचे द्राक्ष युरोपात; येवल्यातून द्राक्ष निर्यात वाढले

संतोष विंचू

Nashik Grapes Export : ऐन खरीपात पिके शेतात करपली, रब्बी तर पिकलाच नाही, शिवाय ७५ वर गावे-वाड्या टँकरवर तहान भागवत आहेत. अशी भयावह दुष्काळी परिस्थिती असलेल्या येवल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या नाकावर टिचून निर्यातक्षम द्राक्ष पिकविली आहेत. प्रतिकूल वातावरणात कृषी विभागाच्या सल्ल्याने साडेचार हजार टन पिकवलेले द्राक्ष नेदरलँड, जर्मनी, युके, डेनमार्क, रशिया आदी देशांमध्ये पोचली आहेत. (nashik 32 crore grapes in Europe despite drought marathi news)

यावर्षीचा द्राक्ष हंगामाचा प्रवास अडथळे पार करत झाला. सुरवातीला द्राक्ष हंगामाला नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. ऐन निर्यात हंगाम सुरु झाल्यानंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे राज्यातील द्राक्ष निर्यात पूर्णपणे थांबली होती. त्यानंतर मार्ग काढत दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून निर्यात सुरु झाली. तरीही यंदा राज्यातून ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत १ लाख ४९ हजार ७२१ टन द्राक्ष निर्यात करण्यात आली आहे.

यावर्षीच्या हंगामामध्ये प्रामुख्याने रशिया, चीन, यूएई, मलेशिया, बांगलादेश देशांमध्ये एकूण ३५ हजार ७२२ टन द्राक्ष निर्यात करण्यात आली. तर नेदरलँड, जर्मनी, बेल्झियम, डेन्मार्क या युरोपियन देशांमध्ये सर्वाधिक १ लाख १३ हजार ९९९ टन द्राक्ष निर्यात झाली आहे. तालुक्यात तर सुरवातीपासून अत्यल्प पावसाचा फटका द्राक्ष बागांना बसला असला तरी कधी पालखेडच्या आवर्तनाचे पाणी तर शेततळ्यातील पाण्यावर शेतकऱ्यांनी बागा फुलवल्या आहे.

अन जिदीने द्राक्ष पिकवली

यंदा दुष्काळ, बेमोसमी पाऊस अन लहरी हवामानामुळे द्राक्ष बागा निघणार की नाही याची शाश्वती नव्हती पण या संकटावर मात करून द्राक्ष निर्यात करून येथील शेतकऱ्यांनी आपली जिद्द सोडलेली नाही हे विशेष. यावर्षी येवल्यामध्ये द्राक्ष निर्यातीसाठी ६८१ शेतकऱ्यांनी ३६१ हेक्टर क्षेत्र नोंदवले होते. (latest marathi news)

यातील तब्बल ४२५ शेतकऱ्यांनी २३० हेक्टर वरील द्राक्ष निर्यात केली आहेत. यावर्षी थॉमसन, क्रीमसन, सोनाकाला आदी वाणाचे द्राक्ष युरोप, नेदरलँड, डेन्मार्क, स्वीडन व अरब देशात पोचली आहे. विशेष म्हणजे द्राक्षाला सरासरी ७१ रुपयाचा प्रती किलोला चांगला भाव मिळाला आहे.

असे मिळाले उत्पन्न

तालुक्याच्या पश्चिम भागातील पाटोदा,पिंपरी, सोमठाणे,मुखेड,मानोरी आदी परिसरातच सर्वाधिक द्राक्ष बागा आहेत. या भागातील ४२५ शेतकऱ्यांनी यंदा द्राक्ष परदेशात पाठवली. २३० हेक्टरवरील तब्बल ४ हजार ५९५ टन द्राक्ष निर्यात झाली असून द्राक्षला ६० ते १२० रुपयांपर्यंतचा दर मिळाला तर सरासरी ७१ रुपये प्रती किलोला दर मिळाल्याने तब्बल ३२ कोटी ६२ लाख रुपयांचे चलन या द्राक्ष निर्यातीत शेतकऱ्यांच्या खिशात पडले आहे. विशेष म्हणजे मागील आठ वर्षात सर्वाधिक द्राक्ष निर्यात यावर्षी दुष्काळ असूनही झाली आहे.

''मागील वर्षी निसर्गाने पिकांचे प्रचंड नुकसान केले. मात्र,शेतकऱ्यांनी गुणवत्ता जपली म्हणूनच द्राक्ष निर्यातीला वाव मिळाला. शेततळ्याचे पाणी आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन यासाठी मोलाचे ठरले.''- शुभम बेरड, तालुका कृषी अधिकारी,येवला

''तालुक्यातील शेतकऱ्यांनी अत्यल्प पाऊस असताना निर्यातक्षम विक्रमी प्रमाणात द्राक्षाचे उत्पन्न पिकविले. मेहनत, जिद्द व निगा राखल्याने यावर्षी रासायनिक अंश विरहित द्राक्ष शेतकऱ्यांनी पिकवले. यंदा वातवरणामुळे मनीची संख्या कमी झाली, घड भरले नसले तरीही निर्यातीचे आकडे समाधानकारक आहे.''- साईनाथ कालेकर, फायटो सॅनेटरी इन्स्पेक्टर,कृषी विभाग,येवला

द्राक्ष निर्यातीचे आकडे (टनामध्ये)

२०१५ ४००

२०१६ १८००

२०१७ २८७३

२०१८ २८००

२०१९ ३७८६

२०२० २७७१

२०२१ ३९००

२०२२ ३५००

२०२३ ४५९५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT