Funding esakal
नाशिक

Nashik ZP News : येवलामधील जिल्हा परिषदेच्या 34 शाळांना मिळणार झळाळी; खोल्यांसाठी अडीच कोटीचा निधी मंजूर

Nashik ZP : मतदार संघातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांची इमारती वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहाच्या विशेष दुरुस्तीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २ कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : मतदार संघातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांची इमारती वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहाच्या विशेष दुरुस्तीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २ कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या शाळांना झळाळी मिळणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाला आहे. (Nashik 34 schools of Zilla Parishad in Yeola will get fund marathi news)

निधीच्या माध्यमातून मतदारसंघातील ३४ जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन वर्ग खोल्या, विशेष दुरुस्ती व पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहे. त्यामुळे या शाळांना झळाळी प्राप्त होऊन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

येवला तालुक्यातील देवरगाव, गोपाळवाडी, फरताळवाडी, साताळी, धनकवाडी, भुलेगांव, ममदापूर, रेंडाळे, पन्हाळसाठे, कोळगांव, सायगांव जिल्हा परिषद शाळेतील नवीन वर्ग खोल्यांसाठी प्रत्येकी ९ लाख ९० हजार, खामगांव जिल्हा परिषद शाळेसाठी १९ लाख ८० हजार, आहेरवाडी, खामगांव जिल्हा परिषद शाळेसाठी प्रत्येकी ८ लाख ५० हजार, वडगांव बल्हे, बोकटे, लमानतांडा, अनकाई, तळवाडे, कौटखेडा, डोगरगांव,मुखेड, खरवंडी, भारम, कुसमाडी, नगरसुल शाळेसाठी प्रत्येकी ४ लाख २५ हजार निधी मंजूर करण्यात आला आहे. (latest marathi news)

निफाड तालुक्यातील कानळद, खानगाव नजिक, वाकद, विंचूर जिल्हा परिषद शाळेतील नवीन वर्ग खोल्यांसाठी प्रत्येकी ९ लाख ९० हजार, प्रतापसागर, टाकळी विंचूर जिल्हा परिषद शाळेसाठी प्रत्येकी ४ लाख ४५ हजार, धारणगाव वीर, वाकद, जिल्हा परिषद शाळेसाठी प्रत्येकी ८ लाख ५० हजार निधी मंजूर करण्यात आला आहे. या शाळांच्या नवीन वर्ग खोल्या, विशेष दुरुस्ती व पायाभूत सुविधांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT