Mahavitaran Fraud
Mahavitaran Fraud esakal
नाशिक

Nashik Mahavitaran Fraud: महावितरणकडून ग्राहकांना 67 लाखांना चुना! मीटर टेस्टिंगच्या नावाखाली 3 वर्षात 23 हजार ग्राहकांना झटका

हर्षवर्धन बोऱ्हाडे

Nashik MSEDCL News : महावितरणच्या नाशिक मंडळ विभागात गेल्या १४ वर्षात ग्राहकांकडून मीटर टेस्टिंगच्या नावाखाली अंदाजे ३ कोटी रुपये शुल्क आकरण्यात आले. परंतु, मिटर टेस्टिंग मात्र करण्यात आलेली नाही. महावितरणकडून मीटर टेस्टिंगच्या नावाखाली ३ वर्षात २३ हजार ६१८ ग्राहकांची ६७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारातून समोर आला आहे.

त्यामुळे या प्रकरणात जागृत नाशिककर मुळाशी जाऊन ग्राहकांकडून घेतलेले पैसे त्यांना परत मिळावे, अशी मागणी करीत आहे. तक्रार केल्यानंतर नाशिक मंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी चौकशीचे दोनवेळा आदेश देवूनही कारवाई झालेली नाही. (Nashik 67 lakhs fraud from Mahavitaran marathi news)

महावितरणच्या मध्यवर्ती सुविधा केंद्र (सीसीएफसी) कार्यालयात प्रतीवर्षी सरासरी १० हजार ग्राहकांकडून मीटर शुल्क तपासणीच्या नावाखाली सरासरी २८ लाख रुपये शुल्क जमा केले जाते. परंतु, त्या वीजमीटरची तपासणी केली जात नाही, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते दर्शन लढ्ढा यांनी मुख्य अभियंत्यांकडे केली होती.

एखादे घर, स्थावर मालमत्ता विकल्यास वीज मीटरचा मालकी हक्क बदल करण्यासाठी महावितरणच्या मध्यवर्ती सुविधा केंद्र (सीसीएफसी) कार्यालयात अर्ज केल्यास महावितरण कंपनीचे सर्व्हिस शुल्क व मीटर तपासणी शुल्क अशी ३६० रुपये फी जमा करावी लागते.

त्यानुसार मीटर तपासणी करणे हे महावितरण अधिकाऱ्यांचे काम आहे, असे असून देखील गेल्या १४ वर्षात असे मीटर तपासणी अहवाल महावितरणकडे उपलब्ध नसल्याचा खुलासा नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या कार्यालयातून देण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते दर्शन लढ्ढा यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार १४ वर्षांच्या माहितीची मागणी अधीक्षक अभियंता कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार वर्ष २०२१, २०२२ व २०२३ या ३ वर्षासाठी २३ हजार ६१८ ग्राहकांकडून ६६ लाख ८० हजार ९५० रुपये मीटर तपासणी शुल्क जमा केल्याचे महावितरण अधिकाऱ्यांनी कळवले. (latest marathi news)

परंतु, या ग्राहकांचे मीटर तपासणी अहवाल उपलब्ध नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. श्री. लढ्ढा यांनी दिलेल्या माहितीनुसार बोटावर मोजण्याइतके ग्राहक सोडल्यास इतर ग्राहकांची मीटर तपासणीच झालेली नाही. मुख्य अभियंत्यांच्या मीटर तपासणी आदेशाबाबत श्री. पडळकर अनभिन्न होते. या सर्व प्रकारामुळे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांचे कार्यालय व इतर महावितरण कार्यालय ‘राम भरोसे’ काम करीत असल्याची चर्चा ग्राहकांमध्ये आहे.

"उर्जामंत्री व मुख्य अभियंत्यांनी दोनवेळा चौकशीचे पत्र देवूनही अधिकारी आदेश मानत नाही. ७ दिवसात अहवाल अपेक्षित असताना तो मिळाला नाही तर मुख्य अभियंत्यांकडून कारवाई अपेक्षित होती. अधिकारी महाराष्ट्र सरकारचे नाव खराब करीत असून, महावितरणमध्ये ग्राहक तक्रार निवारणासाठी सक्षम यंत्रणा नाही. आतातरी मुख्य अभियंत्यांनी चौकशी करून ही रक्कम ग्राहकांना परत करावी."- दर्शन लढ्ढा, सामाजिक कार्यकर्ते

"गिरीश घोटेकर यांच्याकडून मी घर खरेदी केले. डिसेंबर २०२३ मध्ये मीटर टेस्टिंग चार्जेस भरलेले होते. परंतु, मीटर टेस्टिंग करण्यात आलेले नाही. ग्राहक म्हणून माझी फसवणूक झाली आहे."- स्वप्निल लद्दड, ग्राहक

"मीटर टेस्टिंग होते. अनेकवेळा स्पॉटवर मीटर टेस्ट केले जाते. मीटर काढून टेस्ट करण्यापेक्षा साईटवर टेस्ट केले जाते. मीटर साईड टेस्टिंग पण करतात आणि बेंचवर काढून आणून देखील टेस्टिंग करतात. ग्राहकांनी मागणी केली तर टेस्ट रिपोर्ट देतो."

- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT