Ladki Bahin Yojana esakal
नाशिक

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे 8 लाखांवर अर्ज; प्रत्येक गावात शिबिर घेत अर्ज घेण्याचे निर्देश

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातून आठ लाख १९ हजार ९०२ अर्ज प्राप्त झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातून आठ लाख १९ हजार ९०२ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी सहा लाख ७२ हजार ५५८ अर्ज ऑनलाइन अपडेट करण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज अपलोड करताना सोमवारी (ता. २९) सर्व्हर पुन्हा डाउन झाल्याचा त्रास प्रशासनाला सहन करावा लागला. दरम्यान, प्रत्येक गावात शिबिर घेऊन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला केले. (8 Lakh applications of ladki bahin yojana directed to take applications by holding camps in every village )

पालकमंत्री भुसे यांनी मंगळवारी (ता. ३०) ऑनलाइन पद्धतीने या योजनेचा आढावा घेतला. अन्न, नागरी व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर, हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, मुफ्ती मोहम्मद इस्माईल, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, सर्व तहसीलदार, महिला बालकल्याण अधिकारी आदी उपस्थित होते. पालकमंत्री भुसे म्हणाले, की गावात शिबिराच्या माध्यमातून अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तेथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे. (latest marathi news)

अर्जदारांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सहकार्य करावे. योजनेचा अर्ज आधार कार्डसोबत संलग्नित करण्यात येणार असल्याने अर्ज इंग्रजीतून भरून घेणे आवश्यक असल्याने यापूर्वी भरलेल्या अर्जांबाबत ऑनलाइन माहिती भरताना याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. लोकप्रतिनिधींनीही आपापल्या स्तरावर या योजनेची प्रभावी अंमलजावणी करण्याचे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी केले.

अर्जांची परिस्थिती

नाशिक महापालिका- एक लाख ४८ हजार ३४९

पालिका/नगर परिषद- ८४ हजार ३०३

जिल्हा परिषद- पाच लाख ८७ हजार २५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT