Cyber Crime esakal
नाशिक

Nashik Cyber Fraud : बनावट पोर्टलवरून आयपीओ खरेदीतून लाखोंचा गंडा; सायबर भामट्यांनी केली 94 लाखांची फसवणूक

Cyber Fraud : जादा परताव्याचे आमिष दाखवून लाखोंचे गंडा घालणार्या सायबर भामट्यांनी आणखी चौघांना सुमारे ९४ लाखांना गंडा घातला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातत्याने स्टॉक मार्केट, शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली जादा परताव्याचे आमिष दाखवून लाखोंचे गंडा घालणार्या सायबर भामट्यांनी आणखी चौघांना सुमारे ९४ लाखांना गंडा घातला आहे. कोटक कंपनीचे बनावट पोर्टलवरून आयपीओ खरेदीस भाग पाडून ही फसवणूक केली आहे. फसवणूक झालेले सेवानिवृत्त व्यक्तीच्या फिर्यादीनुसार, गेल्या महिनाभरात संशयित सायबर भामट्यांनी व्हॉटसॲपच्या माध्यमातून संपर्क साधला होता. ()

त्यावेळी भामट्यांनी कोटक कंपनीशी साम्य असलेल्या कोटक प्रो, सिपकोटक, कोटक सिक्युरिटी लिमीटेड या कंपन्यांच्या नावाचे बनावट पोर्टल तयार केलेले होते. ते त्यांनी विश्वास संपादन करून फिर्यादीला डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर, त्या बनावट पोर्टलच्या माध्यमातून सायबर भामट्याने विविध कंपन्यांचे आयपीओ खरेदी करण्यासाठी व त्यातून जादा परतावा मिळेल असे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

या आमिषांना बळी पडून सेवानिवृत्त फिर्यादीप्रमाणे शहरातील आणखी तिघांना सायबर भामट्यांनी बळी पाडले होते. या चौघांकडून सायबर भामट्यांने मोठमोठ्या रकमा ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार, चौघांनी गुंतवणूक केली. महिन्याभरातील गुंतवणूकीवरील लाभाची रक्कम पाहून आणखी गुंतवणूक केली. त्यानंतर लाभाची रक्कम काढता येत नसल्याने त्यांनी सायबर भामट्याकडे संपर्क साधला असता, त्यांनी उडवाउडवी केली.

त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसात धाव घेतली. सायबर भामट्यांनी चौघांची ९३ लाख ८८ हजार ५६० रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी अज्ञात सायबर भामट्यांविरोधात नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे हे तपास करीत आहेत.

''सोशल मीडियावरून शेअर मार्केट, आयपीओ खरेदी करण्याऐवजी तज्ज्ञ शेअर ब्रोकर्सकडून आर्थिक व्यवहार करावा. सोशल मीडियावरून फसवणुकीचीच शक्यता अधिक असून, सायबर भामट्यांपासून सावध राहावे.''- सुभाष ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT