Crowd of farmers to buy urea at the center of Vavi buying and selling union. esakal
नाशिक

Nashik News : सिन्नरला 650 मेट्रिक टन युरिया उपलब्ध : अभिजित जमदाडे

Nashik News : नाशिक जिल्ह्यात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बफर स्टॉक मधून युरिया उपलब्ध करून दिला जात आहे.

अजित देसाई

Nashik News : नाशिक जिल्ह्यात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बफर स्टॉक मधून युरिया उपलब्ध करून दिला जात आहे. शेतकऱ्यांनी युरियाची अनावश्यक खरेदी न करता गरजेप्रमाणे खरेदी करावी. म्हणजे उपलब्ध साठा अधिकाधिक शेतकऱ्यांना वितरित करणे शक्य होईल असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मोहीम अधिकारी अभिजित जमदाडे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना केले. (Abhijit Jamdade statement 650 MT Urea available to Sinnar)

नाशिक जिल्ह्यात सुमारे साडेसात हजार मॅट्रिक टन बफर स्टॉक उपलब्ध आहे. त्यापैकी ६१० टन साठा आदिवासी तालुक्यांसाठी खुला केला असून २००० मॅट्रिक टन युरियाचे उर्वरित जिल्ह्यात वितरण करण्यात येत असून सिन्नर तालुक्यात विशेष करून पूर्व भागात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने युरियाची मागणी वाढली असल्याने बफर स्टॉक मधून सिन्नरला २०० टन युरिया देण्यात आला आहे.

खरेदी-विक्री संघामार्फत सिन्नर, दापूर, वावी, पांढुर्ली या केंद्रांवर प्रत्येकी १० टन याप्रमाणे ४० टन बफर साठा वितरणासाठी उपलब्ध झाला आहे. पाऊस सुरू झाल्यावर मागणी वाढेल त्याप्रमाणे बफर स्टॉक मधून पुरेसा युरिया उपलब्ध होईल. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील शंभर फर्टिलायझर्स कडे २४०० टन युरिया येत्या काही दिवसात येणार आहे.

त्यापैकी आणखी २०० टन युरिया सिन्नरमध्ये उपलब्ध होईल असेही श्री. जमदाडे यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात किरकोळ खत विक्रेत्यांकडे युरियाचा ३९ हजार ३९२ मॅट्रिक टन साठा असून त्यापैकी ६५० मेट्रिक युरिया सिन्नरमध्ये उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. (latest marathi news)

सिन्नरसह नाशिक जिल्ह्यातील युरिया वितरणावर कृषी विभागाचे लक्ष आहे. ज्या भागात पाऊस अधिक झाला तिथून युरियाची मागणी वाढणे साहजिक आहे. शेतकऱ्यांनी पुढे तुटवडा होईल म्हणून एकाच वेळी अधिक खरेदीचा आग्रह धरू नये. तसे केल्यास युरियाची कृत्रिम टंचाई देखील होऊ शकते. गरजेप्रमाणे खरेदी केल्यास सर्वांना युरिया मिळेल.

१० टन युरिया

सिन्नर खरेदी विक्री संघाच्या मार्फत त्यांच्या विक्री केंद्रावर प्रत्येकी १० टन युरिया बफर स्टॉक मधून उपलब्ध झाला आहे. पुढच्या काळात गरजेनुसार आणखी बफर स्टॉक उपलब्ध करून दिला जाणार आहे.

"जिल्ह्यात कुठेही युरिया तुटवडा जाणवणार नाही याची नियोजन करण्यात आले आहे. बफर स्टॉक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. गरजेप्रमाणे तो वितरित केला जाईल. कृत्रिम टंचाई निर्माण करून एखादा दुकानदार युरिया द्यायला नकार देणार असेल तर त्याचे विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. यासाठी तालुकास्तरावर पथके कार्यान्वित आहेत. तसेच शेतकऱ्यांनी पंचायत समिती स्तरावर कृषी विभागाकडे तक्रारी कराव्यात." - अभिजित जमदाडे (मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT