Crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : ‘लिव्ह-इन’मध्ये राहताना विवाहितेवर अत्याचार; आडगाव पोलिसात गुन्हा दाखल

Nashik Crime : विवाहितेसमवेत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना ४० वर्षीय संशयिताने तिच्यावर लैगिंक अत्याचार केले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विवाहितेसमवेत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना ४० वर्षीय संशयिताने तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. मात्र नंतर त्यांच्या खटके उडू लागल्यानंतर त्याने अत्याचाराबाबत वाच्यता केल्यास कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडित विवाहितेने आडगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, संशयिताविरोधात बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ()

आमोद सुभाष बुद्धीसागर (४०) असे संशयिताचे नाव आहे. नांदूर नाका परिसरात राहण्याऱ्या २६ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला असून तिला दोन अपत्ये आहेत. दोन वर्षांपूर्वी तिचा पती तिला सोडून गेला आहे. दोन अपत्यांसह राहण्याऱ्या पीडितेचा काही महिन्यांपूर्वी संशयित बुद्धीसागर याच्याशी ओळख झाली. त्यानंतर ऑगस्ट २०२२ पासून दोघे लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये राहू लागले होते.

या दरम्यान संशयित बुध्दीसागर याने पीडितेवर नांदूरनाका, त्रिमूर्ती चौक परिसरातील घरी पीडितेवर लैंगिक व अनैसर्गिक अत्याचार केले. दरम्यान, काही दिवसांपासून पीडितेने बुद्धीसागर याच्यासोबत राहण्यास नकार दिल्याने त्यावरून त्यांच्यात खटके उडत होते. तर, संशयिताने, कुठे या प्रकाराची वाच्यता केलीस तर तुझ्या कुटुंबास जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली होती.

त्यामुळे पीडितेने आडगाव पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार संशयिताविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत. गुन्ह्याचा तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील या करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Certificate Cancellation: कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे सरकारचा मोठा कट, बदला घेतल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांचा थेट इशारा

Marathi News Live Updates : एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला, आता हीच उपकाराची परतफेड का? मनोज जरांगे यांचा थेट सवाल

Uttarakhand Travel: Uttarakhand 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' ट्रेकिंगसाठी खुली; ब्रिटिश पर्वतारोहकांनी कसा लावला होता 'हिमालयीन नंदनवनाचा' शोध?

Meerut Viral Video: मेरठमध्ये कांवडियांनी पोलिसांना मारहाण केली? व्हायरल व्हिडिओमागचं खरं सत्य समोर

काळीज चिरणारा Video: मॅच सुरू असताना वीज कोसळली अन् २४ वर्षीय खेळाडूचा जागीच मृत्यू...

SCROLL FOR NEXT