Nashik Accident News  esakal
नाशिक

Nashik Accident News : आयशर चालकाच्या वैदयकीय चाचणी अहवालाची प्रतिक्षा

Nashik Accident : आयशर ट्रक व ब्रिझा कारच्या अपघातप्रकरणी आयशर ट्रक चालकाविरोधात चौघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : मुंबई - आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात झालेल्या आयशर ट्रक व ब्रिझा कारच्या अपघातप्रकरणी आयशर ट्रक चालकाविरोधात चौघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जखमी आयशर ट्रक चालकाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे, परंतु अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. पोलिसांच्या त्या अहवालाची प्रतीक्षा असून त्यातून त्याने मद्यपान केले की नाही, हे निष्पन्न होणार आहे. (Awaiting Eicher driver medical test report )

बापू मोतीराम अहिरे (रा. पंचशीलनगर, ओझर) असे संशयित चालकाचे नाव आहे. अजीज फिरोज तांबोळी (रा. सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता. १२) मध्यरात्री महामार्गावरील श्री चक्रधर मंदिरासमोर भरधाव वेगातील आयशरने (एमएच १५ जीव्ही ९१९०) दुभाजक तोडून विरुद्ध लेनला येत समोरून येणाऱ्या ब्रीझा कारला (एमएच ०५ डीएच ९३६७) धडक दिली होती. यात रहेमान सुलेमान तांबोळी (४२), अरबाज चंदुलाल तांबोळी (१९), सिजाउद्दीन ऊर्फ सज्जू नवाब शेख (४०), अक्षय लक्ष्मण जाधव (२४) हे गंभीररीत्या जखमी होऊन जागीच ठार झाले होते.

याप्रकरणी आयशर ट्रक चालक बापू अहिरे याच्याविरोधात आडगाव पोलिसात चौघांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक मयूर निकम हे तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणी संशयित ट्रकचालकाचे रक्तनमुने घेण्यात आलेले आहेत. यातून त्याने मद्यपान केले होते की नाही हे स्पष्ट होणार आहे. या अहवालाची पोलिसांना प्रतिक्षा असून, चालकाने मद्यपान करून ट्रक चालविला असेल तर त्यांच्याविरोधात ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या कलमान्वयेही गुन्ह्यात नोंद केली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT