Nashik Bus Accident Sakal
नाशिक

Nashik Accident : कंडक्टर प्रवाशांना उठवायला मागे वळला अन्...; कंपनीचं स्पष्टीकरण

या बसमध्ये प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले होते, असाही आरोप केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

नाशिकजवळ एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आणि त्यामध्ये १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. मुंबईच्या दिशेने चाललेल्या बसची एका कंटेनरला धडक बसली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. हा अपघात कसा झाला, नक्की काय झालं, याबद्दल प्रवासी, प्रत्यक्षदर्शींनी आपले अनुभव सांगितले आहेत. त्यानंतर आता बसच्या संचालकांनी या अपघाताबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

आपल्याला कंडक्टरने फोन करून अपघाताची माहिती दिल्याचं चिंतामणी ट्रॅव्हल्सचे संचालक गुड्डू जयस्वाल यांनी सांगितलं. सकाळी कंडक्टरचा फोन आला, मोठा अपघात झालाय. एवढंच तो मला म्हणाला. त्यालाही नेमकं काय झालं कळलं नाही. अपघातावेळी कंडक्टर बसच्या मागच्या बाजूला गेला होता. एका पॅसेंजरला उठवायला कंडक्टर गेला होता. तितक्यात हा अपघात घडला. त्यामुळे नक्की काय झालं, हे त्यालाही नीट माहिती नाही.

शॉर्ट सर्किट झाल्याने बसने पेट घेतला असू शकतो, असं ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकांनी सांगितलं आहे. प्रवासाआधी बसचा फिटनेस, मेन्टेनन्स नियमितपणे केला जातो. प्रत्येक फेरीपूर्वी ही तपासणी केली जाते, असंही संचालक म्हणाले. या बसमध्ये प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले होते, असाही आरोप केला जात आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भेसळयुक्त दूध पिताय का? उकळताच बनलं रबर, धक्कादायक VIDEO आला समोर

Court Restrooms: हे वापरकर्त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन; कोर्टातील अस्वच्छ स्वच्छतागृहांबाबत स्थिती अहवाल सादर

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचा निर्णय काँग्रेसच घेणार; महापौरपदासाठी कार्यकर्त्यांवर विश्वास – सचिन सावंत

Beat Firecracker Fumes: फाटाक्यांच्या धुरामुळे किडनी अन् यकृतासंबंधित समस्या वाढल्यास करा 'हे' 5 घरगुती उपाय

PAK vs SA Test: पाकड्यांचे घरच्या मैदानावर वस्त्रहरण; दक्षिण आफ्रिकेने दाखवली जागा; WTC मध्ये दिला शेजाऱ्यांना धक्का

SCROLL FOR NEXT