Nashik Bus Accident esakal
नाशिक

Nashik Bus Fire: ''जाग आली अन् बघतो तर..."; बसमधील छोट्या आर्यनचा थरारक अनुभव

सकाळ डिजिटल टीम

Nashik Accident News : येथील औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुलीवर शनिवारी (ता. ८) पहाटे साडेचार ते पावणेपाचच्या आयशर ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला. ट्रॅव्हले क्षणार्धात पेट घेतला अन् काही क्षणात बसला आगीने वेढले. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी स्थानिकांनी तात्काळ बसच्या दिशेने धाव घेतली. बसच्या खिडकीच्या काचा फोडून प्रवाशांना पेटत्या बसबाहेर काढण्यात आले.

(Nashik Accident News Aryans in the bus share thrilling experience of accident)

जीव वाचविण्यासाठी प्रवाशांच्या खिडकीतून उड्या

जीव वाचविण्यासाठी बसमधील प्रवासी खिडकीतून उड्या घेत होते. त्या प्रवाशांना नागरिकांनी रस्त्याच्या कडेला बसविले. अतिशय भयंकर अशा या अपघातातून सुखरुप बचावलेल्या आर्यन या बालकाने या प्रसंगाचे थरारक वर्णन ‘सकाळ’शी बोलताना सांगितले

बसमध्येच असलेला आर्यन सांगतो...

या अपघातावेळी बसमध्येच असलेला अन् अपघाताचे सर्व प्रसंग आपल्या डोळ्यांनी पाहिलेला ८ वर्षीय आर्यन जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. अपघाताची भीषणता अनुभवलेला छोटा आर्यन सांगतो आम्ही सर्वजण झोपलो होतो. आमची बस जोरात धडकली अन् मोठ्ठा आवाज झाला आणि अचानक आरडोओरड सुरु झाली. डोळे उघडून बघीतलं तर बसला आग लागली होती. सर्वजण बसच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते.

गाडीच्या दाराजवळ मोठी आग लागली होती त्यामुळे बाहेर पडण्यासाठी बाहेर उभ्या असलेल्या काकांनी खिडकीच्या काचा फोडल्या. गाडीतील लोक खिडकीतून उड्या मारत होते. मला, माझ्या आई आणि भावाला काकांनी खिडकीतून बाहेर काढले आणि दवाखान्यात आणले. गाडीच्या बाहेर आलो तेव्हा सगळी गाडी पेटलेली होती. जे बाहेर येवू शकले नाही ते माझ्या समोर जळत होते असा थरारक प्रसंग छोट्या आर्यनने ‘सकाळ’शी बोलताना सांगितला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चारित्र्य पडताळणी दाखला कसा काढायचा? महा-ई-सेवा केंद्रातून ‘या’ वेबसाईटवर करा अर्ज, १५९ रुपयांच्या शुल्कात ७ दिवसांत मिळेल दाखला, वाचा...

आजचे पंचांग १० ऑगस्ट २०२६! सोमप्रदोषासह जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

Falahari Sandwich: उपवासात रोज साबुदाणा नको! झटपट बनवा चटपटीत फलाहारी सँडविच; चवीसोबत पोटही राहील भरलेलं

आजचे राशिभविष्य - १० ऑगस्ट २०२६

ढिंग टांग : आखरी रस्ता : एक पाहणी..!

SCROLL FOR NEXT