A motorcycle rider injured in an accident. esakal
नाशिक

Nashik Accident News: भरधाव दुचाकी ट्रकवर आदळून धार्नोलीचे दोघे ठार, तिसरा जखमी

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर : मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरीजवळ रविवारी (ता. २४) मुंबईहून नाशिककडे जात असताना दुचाकीने ट्रिपल सीट जाणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. (Nashik Accident Two killed third injured in Dharnoli collision with speeding two wheeler truck)

साई कुटीर परिसरात सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेत दुचाकी बॅरिकेट्‍‍स तोडून पुढे चालणाऱ्या ट्रकवर मागून जाऊन जोरदार आदळली.

या अपघातात समाधान देवराम भगत, सचिन कचरू पथवे (रा. धार्नोली, वैतरणा) हे दोघे ठार झाले; तर भाऊ भगत (रा. खंबाळे) हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती गावात पसरताच परिसरात शोककळा पसरली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, महामार्ग सुरक्षा पोलिस उपनिरीक्षक हरी राऊत, पोलिस हवालदार विजय रुद्रे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांना टोल नाक्याच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

घटनास्थळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्परतेने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दुचाकीवरील तिघेही महिंद्र कंपनीचे कामगार असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT