Spraying by drone
Spraying by drone esakal
नाशिक

Nashik Agriculture News : 10 मिनिटांत एकराची होणार फवारणी! नॅनो युरिया, डीएपी फवारणीसाठी इफ्कोचे अडीच हजार ड्रोन

सकाळ वृत्तसेवा

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रासायनिक खतांच्या वाढती किंमत आणि त्यांच्या वापरामुळे निसर्गाची होणारी हानी रोखण्यासाठी ड्रोनद्वारे डीएपी, नॅनो युरियाची फवारणी करण्यात येणार आहे. ‘इफ्को’ या कंपनीच्या माध्यमातून अडीच हजार ड्रोन देशभरातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्या दृष्टीने युवकांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. (Nashik acre will be sprayed in 10 minutes news)

शेतीत रासायनिक खतांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे जमिनीची पोत खालावत असून, उत्पादित शेतमाल आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून लिक्विड स्वरुपातील नॅनो युरियाची पिकांवर फवारणी करण्यात येते. नाशिकमध्ये नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी शिरसाठे या गावात ड्रोनद्वारे फवारणीच्या प्रयोगाचा शुभारंभ केला.

इंडियन फामर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेडने (इफ्को) देशातील पहिला नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प उभारला आहे. नॅनो युरिया हा युरिया या रासायनिक खताचाच एक महत्त्वाचा प्रकार मानला जातो. किमतीसह शेतकऱ्यांना परवडणारा, वेळेची बचत करणारा असल्याने त्याची भविष्यात मागणी वाढणार आहे.

आजच्या घडीला युरियाची ४५ किलोची गोणी ३८०० रुपयांना मिळते. शेतकऱ्यांना सबसिडी मिळाल्यानंतर ती २६५ रुपयांना मिळते. या तुलनेत नॅनो युरियाची अर्धा लिटरची बॉटल २२५रुपयांना मिळते. एक ते अर्धा लिटरमध्ये जवळपास एक एकरावरील पिकांवर फवारणी केली जाते.

मात्र पिकांनुसार हे प्रमाण बदलते. पिकांवर फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे. बी.एससी ॲग्री ते किमान बारावी उत्तीर्ण व्यक्तींना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर ड्रोनद्वारे फवारणी केली जाणार आहे. साधारणतः २०० ते ३०० रुपये एकराने ही फवारणी केली जाईल. एका एकरला दहा ते वीस मिनिटांत फवारण्याची क्षमता या ड्रोनमध्ये असल्यामुळे त्याला शेतकऱ्यांची फार पसंती लाभणार असल्याचे दिसते.

बॅटरीवर आधारित ड्रोनची यंत्रसामग्री ही साधारणत: तीन ते चार लाखांपर्यंत मिळते. येत्या खरीप हंगामापासून ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याने ‘इफ्को’मार्फत व्यक्तींना प्रशिक्षण दिले जात आहे. कुठल्या शहरांना किती ड्रोन मिळणार याची लवकरच घोषणा होणार आहे.  (latest marathi news)

नॅनो युरिया म्हणजे काय?

नॅनो युरिया हे एक आधुनिक नत्र व स्फुरदयुक्त द्रवरूप खत आहे. युरिया या रासायनिक खताचे लिक्विड असेही त्याला आपण म्हणू शकतो. पिकांच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्‍यक असते. नॅनो युरियात ४ टक्के नत्र नॅनो कणांच्या स्वरूपात असतो. त्यामधील नॅनो नत्र कणांचा आकार हा ३० ते ५० नॅनोमीटर इतका आहे.

या युरियात नत्राचे कण हे अतिसूक्ष्म असल्यामुळे ते एकसंध असतात. त्यांचे पृष्टभागीय क्षेत्रफळ हे पारंपारिक युरियापेक्षा दहा हजार पट जास्त असल्यामुळे त्याची कार्यक्षमता ९० टक्क्यांपर्यंत असते. जी पारंपारिक युरियामध्ये ३० ते ५० टक्के दिसून येते.

"शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी ‘इफ्को’च्या माध्यमातून प्रशिक्षण झाले आहे. देशातील विविध ठिकाणी हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. येत्या खरीप हंगामापासून या ड्रोनचा प्रत्यक्षात वापर करण्याचे नियोजन आहे."- साधना जाधव, संचालक, इफ्को, नवी दिल्ली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT