Action against 5 thousand heavy vehicles  esakal
नाशिक

Nashik News : 6 महिन्यात 5 हजार अवजड वाहनांवर कारवाई; मालेगाव वाहतूक पोलिसांकडून 56 लाखांचा दंड वसूल

Nashik News : वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मालेगाव येथील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अनेक अवजड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

जलील शेख

Nashik News : मालेगाव ते थेट कुसुंबापर्यंत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण झाले आहे. रस्ता दर्जेदार असल्याने वाहन चालकांचा वेळ, टोलची बचत होत असल्याने ट्रेलर, मोठी ट्रक, अवजड वाहने कुसुंबा रस्त्याने मार्गक्रमण करुन मालेगाव शहरात येतात. द्यानेपासून थेट गिरणा पुलापर्यंत या वाहनांमुळे वाहतुक कोंडी होते. (Action against 5 thousand heavy vehicles in 6 months)

अशा वाहनांना महापालिकेतर्फे सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत शहरात प्रवेशबंदी घातली आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखेने सहा महिन्यात ४ हजार ९३१ अवजड वाहनांवर कारवाई करत सुमारे ५६ लाखाचा दंड वाहनचालकांना दिला आहे. द्याने, कुसुंबा रोड, नवीन बसस्थानक, मोसम पुल ते गिरणा पुल या भागातून अजवड वाहने मोठ्या प्रमाणात जातात. अवजड वाहनांमुळे शहरात वाहतुक कोंडी होते.

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी येथील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अनेक अवजड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. येथील शिवतीर्थ जवळील रस्त्याचे काम सुरु आहे. तसेच, कुसुंबा रस्त्यावर अतिक्रमण असल्याने अवजड वाहने गेल्यास येथे वाहनांच्या रांगा लागतात. कुसुंबा रस्त्यावरुन शहरात गुजरात व राजस्थान येथील वाहने मोठ्या प्रमाणात येतात.

या वाहनांना धुळ्याकडून मालेगावकडे येताना दोन ते तीन तासाचा, तसेच ३० ते ४० किलोमीटर अंतर व सुमारे १२०० ते १६०० रुपयांपर्यंत टोल लागतो. ही वाहने शहरातून येतांना त्यांचा वेळ, पैसा व डिझेलही वाचत असल्याने अनेक वाहने शहरातून येतात. या वाहनांवर पायबंद घालण्यासाठी येथील शहर वाहतूक शाखेने मोठी कारवाई केली आहे. या वाहनांना ५०० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत दंड दिला जातो. (latest marathi news)

दंड देण्यासाठी ई-मशीनचा वापर केला जातो. शहरात वाहतूक शाखेकडे चार ई-मशीन आहेत. कारवाई करताना येथे सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत कारवाई होते. २०२४ मध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत ४ हजार ९३१ अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून शहर वाहतूक शाखेला ५६ लाख २ हजार ८५० रुपयांचा महसूल मिळाला आहे. सहा महिन्यांमध्ये सर्वात जास्त मे महिन्यात १ हजार ५२८ अवजड वाहनांवर कारवाई झाली आहे.

"नागरीकांनी नेहमीच वाहतूक नियमांचे पालन करावे. वाहतुकीला अडथळा देणाऱ्या ठिकाणी वाहने उभी करु नयेत. वाहने चालवितांना शिस्तीचे पालन करावे. तसे केल्यास रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही."

- अनिकेत भारती, अप्पर पोलिस अधिक्षक, मालेगाव

सहा महिन्यात आकारण्यात आलेला दंड

महिना - वाहन संख्या - आकारलेला दंड

जानेवारी - ६५२ - ६ लाख ६२ हजार ७५० रुपये

फेब्रुवारी - ६३९ - ६ लाख ७८ हजार ५०० रुपये

मार्च - ६५८ - ७ लाख २८ हजार २०० रुपये

एप्रिल - ५७३ - ६ लाख ३१ हजार ९०० रुपये

मे - १५२८ - १६ लाख ३३ हजार रुपये

जून (२५ तारखेपर्यंत) - ११८१ - १२ लाख ६८ हजार ५०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup Controversy : टी-२० वर्ल्डकपच्या वादात आता शाहीद आफ्रिदीची उडी; ICC वर केले गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाला?

Nashik Crime : खळबळजनक! ४०० कोटींच्या कंटेनर लुटीप्रकरणी पाच आरोपींना पोलीस कोठडी; 'एसआयटी'चा वेगाने तपास

Nagpur News: दहावीच्‍या विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवलं; भावाने खोलीचे दार उघडलं धक्काच बसला, आईने फोडला हंबरडा!

Latest Marathi news Live Update: तुळजापुरात सलग सुट्यांमुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Government Jobs: भारत सरकारसोबत काम करण्याची सुवर्णसंधी! या लोकांना मिळणार चान्स, अर्ज करा लगेच!

SCROLL FOR NEXT