Tribal farmers from across district participated in protest at collectorate office for various demands. esakal
नाशिक

Nashik Adivasi Morcha : ‘लाल वादळा’च्या मुक्कामाने प्रशासनाची भंबेरी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

Nashik : ‘किसान सभा झिंदाबाद, झिंदाबाद’ अशा घोषणा आणि डोक्यावर लाल टोपी परिधान करत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून नाशिकमध्ये धडकलेल्या लाल वादळाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी मुक्काम ठोकला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Adivasi Morcha : ‘लाल बावटा की जय’, ‘लाल झेंडे को सलाम’, ‘किसान सभा झिंदाबाद, झिंदाबाद’ अशा घोषणा आणि डोक्यावर लाल टोपी परिधान करत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून नाशिकमध्ये धडकलेल्या लाल वादळाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (ता. २६) मुक्काम ठोकला.

शासनदरबारी मागण्या मान्य होईपर्यंत येथून न उठण्याची भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या आंदोलकांनी घेतली आहे. (Nashik Adivasi Morcha Marathi News)

यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सीबीएस ते मेहेर सिग्नलपर्यंतचा रस्ता बंद झाला. दरम्यान, आंदोलकांच्या शिष्टमंडळाची मंगळवारी (ता. २७) दुपारी दीडला मुंबईत महसूलमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे.

जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर लावावीत यांसह विविध मागण्या प्रलंबित असल्याने शेतकरी, कष्टकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दोनवेळा आंदोलन करूनही सरकारने आश्वासनांच्या पलीकडे काही दिले नाही.

त्यामुळे संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. यात शासकीय कन्या शाळेच्या बाजूने पेठ, दिंडोरी, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर व इगतपुरीचे लोक बसले, तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूने सुरगाणा, कळवण, बागलाण, त्र्यंबकेश्वर, नाशिक व निफाडच्या लोकांनी मुक्काम ठोकला आहे.

आंदोलकांनी अन्न शिजविण्यासाठी लाकूड, गॅस, तांदूळ, तेल व मसाला आणला आहे. प्रत्येक तालुक्यांसाठी नियुक्त व्यक्तीने आपल्या लोकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी निश्चित केली आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकरी व कष्टकरी पायी मोर्चाद्वारे सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास शहरात पोचले. मोर्चेकऱ्यांनी गोल्फ क्लब मैदानावर जाऊन थांबण्याची विनंती धुडकावली आहे. (Latest Marathi News)

मंत्रालयात आज बैठक

महसूल व वनेमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २७) दुपारी दीडला मुंबईमध्ये बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी मोर्चेकऱ्यांना निमंत्रित केले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांची आंदोलनस्थळी भेट घेत मुंबईला बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे गावित यांच्यासह काही पदाधिकारी मंगळवारी सकाळीच बैठकीसाठी मुंबईला रवाना होणार आहेत.

"महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील २०१८ पासून आमच्या मागण्यांचा अभ्यास करत आहेत. आता त्यांना निर्णय घ्यावाच लागेल. योग्य निर्णय घेतला नाही, तर आम्ही येथून उठणारच नाही."- जे. पी. गावित, माजी आमदार

"आंदोलकांच्या मागण्या या राज्यस्तरावर आणि धोरणात्मक बाबींशी निगडित असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचे आश्वासन देऊ शकत नाही. पालकमंत्री व महसूलमंत्र्यांनी मंगळवारी त्यांच्यासोबत बैठक बोलावली आहे. यातून सकारात्मक तोडगा निघेल, अशी आशा आहे."- जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक

"शेतीमालाला भाव मिळत नाही, उपासमारीची वेळ आली आहे. तरी सरकार आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. अनेक वर्षांपासून आम्ही जमीन कसतो. त्यावर आमचे नाव का लागत नाही."- पारीबाई सापके, केळुने (ता. सुरगाणा)

"आम्ही इतक्या लांबून येथे आलो तरी आम्हाला पाणी मिळाले नाही. जेवणाची सोय नाही. आदिवासी म्हणून आमच्याविरोधात सरकार काहीपण करेल; पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही हटणार नाही."-चिमणा मिसाळ, उंबरदे (ता. सुरगाणा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT