The fruit of the karvanda tree in the hills and valleys of the taluk. esakal
नाशिक

Nashik News : पांढऱ्या शुभ्र फुलांनी बहरल्या करवंदांच्या जाळ्या! आदिवासींना मिळणार रोजगार

Nashik : तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्यात पांढऱ्‍या फुलांनी करवंदांची झाडे बहरल्याने मनमोहक दृश्‍य दिसून येत आहे. काही दिवसांतच आदिवासींना रोजगार उपलब्ध होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्यात पांढऱ्‍या फुलांनी करवंदांची झाडे बहरल्याने मनमोहक दृश्‍य दिसून येत आहे. काही दिवसांतच आदिवासींना रोजगार उपलब्ध होणार आहे. जांबुटके, ननाशी, गोळशी, गांडोळा, भनवड, चारोसे, पालखेड आदी परिसरात तसेच झाडाझुडुपांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रानटी फळे अर्थात रानमेव्याचे अस्तित्व टिकून राहत आहे. या रानमेव्यात प्रामुख्याने करवंद, आळू, आमगुळे, तोरणे या झुडुप जातीच्या वृक्षांना आता फुले येऊ लागली आहेत. (Nashik Adivasi will get employment due to nets of karvand blooming with white flowers marathi news News)

करवंदाच्या जाळ्या सध्या पांढऱ्‍या रंगाच्या फुलांनी बहरल्या असल्याने मनमोहक दृश्‍य दिसून येत आहे. तोंडाला पाणी सुटेल असा चविष्ट, आंबट-गोड, रसाळ रानमेवा म्हणजे करवंद होय. जिभेवर ठेवताच तासन् तास या रानमेव्याची विशिष्ट चव रेंगाळत राहते. चैत्र महिना सुरु झाल्यानंतर प्रथम दर्शन होते ते आंबट-गोड चवीच्या करवंदांचे. डोंगराच्या कुशीत या काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात. (latest marathi news)

फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगाचे करवंद बहरतात. पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो. करवंद हे बेरीवर्गीय फळ असून, त्याचा आरोग्याच्या दृष्टीने उपयोग होतो. यामधील अनेक घटक रोगप्रतिबंधाचे काम करतात. करवंद नाशवंत फळ असल्याने जास्त काळ टिकत नाही,. मात्र, कच्च्या करवंदांचे लोणचे व पिकलेल्या करवंदांचा मुरब्बा केला तर जास्त दिवस टिकतो.

संवर्धनाची गरज

तोडलेली करवंद आजूबाजूच्या खेड्यापाड्यात तसेच तालुक्याच्या ठिकाणी विक्रीसाठी नेली जातात. त्यातून चार पैसे मिळतात. परंतु, सध्या डोंगरांना लागणारे वणवे व वृक्षतोडीमुळे रानमेवा धोक्यात आला आहे. झाडांची संख्या कमी होत असल्याने या करवंदासारख्या झाडांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. शिवाय फळांवरील प्रक्रियायुक्त उत्पादनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT