Admission  esakal
नाशिक

Collage Admission : ‘डिप्‍लोमा’ प्रवेश अर्जाची 25 जूनपर्यंत मुदत; दहावीनंतरचा पर्याय

Nashik News : तंत्रशिक्षण शाखेतील पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाची प्रक्रिया बुधवार (ता. २९)पासून सुरू झाली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचे वेध लागले आहेत. तंत्रशिक्षण शाखेतील पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशाची प्रक्रिया बुधवार (ता. २९)पासून सुरू झाली. प्रवेश वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदत दिलेली आहे. दरम्‍यान, नाशिक विभागात १८ हजार ८३६ जागा उपलब्‍ध असतील. (Admission process for Diploma Course in Technical Education is up to 25th June)

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ही प्रक्रिया राबविली जाते आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान/ वास्‍तुकला अभ्यासक्रमातील पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमाचे प्रवेश वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. तंत्रशिक्षण शाखेतून करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाकडे न वळता थेट पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्‍या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्याचा पर्याय खुला असतो.

पदविका अभ्यासक्रमानंतर थेट नोकरी, व्‍यवसायाची संधी उपलब्‍ध होऊ शकते. गेल्‍या काही कालावधीत नवनवीन शाखांतील पदविका अभ्यासक्रम उपलब्‍ध होत असून, त्‍यास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या पदविका अभ्यासक्रमासाठी केवळ अर्ज भरण्याच्‍या प्रक्रियेपर्यंतचे वेळापत्रक जारी केले असून, कॅप राउंडचे वेळापत्रक यथावकाश जाहीर केले जाणार आहे.

...तर प्रवेशप्रक्रियेतून विद्यार्थी ठरतील बाद

प्रवेशाच्‍या प्रक्रियेत कागदपत्रांची पडताळणी अत्‍यंत महत्त्वाची ठरणार आहे. ई-स्‍क्रूटिनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रूटिनी या दोन्‍हीपैकी कुठल्‍याही एका पद्धतीने विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागते. (latest marathi news)

ही प्रक्रिया पूर्ण करण्यास विद्यार्थी असमर्थ राहिल्‍यास त्‍यांना कॅप किंवा नॉन-कॅप अशा कुठल्‍याच स्वरूपाच्या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार नाही व ते प्रक्रियेतून बाद ठरतील, असे स्‍पष्ट केले आहे. तसेच जातवैधता प्रमाणपत्र, ईडब्‍ल्‍यूएस यांसारख्या प्रमाणपत्रांची वैधता ३१ मार्च २०२५ असणे आवश्‍यक असल्‍याचेही नमूद केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रवेश क्षमता अशी

जिल्‍हा उपलब्‍ध जागा

नाशिक ८,४०२

नगर ४,७२८

धुळे २,०९७

जळगाव २,८९३

नंदुरबार ७१६

एकूण १८,८३६

...असे आहे प्रवेश वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची मुदत-----------------२५ जूनपर्यंत

प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्‍चिती------२५ जूनपर्यंत

तात्‍पुरती गुणवत्तायादी प्रसिद्धी---------------------------२७ जून

यादी संदर्भात तक्रार, हरकत नोंदविण्याची मुदत------------२८ ते ३० जून

अंतिम गुणवत्तायादीची प्रसिद्धी-----------------------------२ जुलै

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Chh. Sambhaji Nagar News : फुलंब्री निवडणुकीत जादूटोण्यामुळेच निवडणुकीत पराभव; शिवसेना उमेदवाराचा गंभीर आरोप!

Alandi Election : आळंदी नगरपरिषदेतील गटनेता, उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्य निवडीसाठी चर्चासत्र सुरु!

SCROLL FOR NEXT