Summer Heat esakal
नाशिक

Nashik Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा; तापमान पोहोचले 43.8 अंशांवर, जनजीवन प्रभावित

Summer Heat : शहर व परिसरात दीड महिन्यापासून सूर्यदेव जणू आग ओकत आहे. असह्य उन्हाने नागरिक त्रस्त झाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Summer Heat : शहर व परिसरात दीड महिन्यापासून सूर्यदेव जणू आग ओकत आहे. असह्य उन्हाने नागरिक त्रस्त झाले. सकाळी दहापासूनच उन्हाच्या झळा सुरू होतात, त्या रात्री उशिरापर्यंत कायम असतात. मेच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (ता. १) पारा ४३ अंशांवर, तर गुरुवारी (ता. २) तापमान ४२.४ अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी (ता. ३) पारा ४३.८ अंशांवर पोहोचला होता. ( affecting life due to temperature reached 43 degrees )

बाजाराचा दिवस असल्याने व्यावसायिकांना कडक ऊन अंगावर झेलतच दुकाने लावावी लागली. येथे २९ एप्रिलला हंगामातील सर्वांत उच्चांकी ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून तापमान वाढायला सुरवात झाली. एप्रिल उजाडताच पारा ४२ अंशांच्या आसपास आहे. येथे १८ एप्रिलला ४३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते.

दोन दिवसांचा अपवाद वगळता महिन्यापासून पारा ४० ते ४४ अंशांदरम्यान राहिला. ६ मे ते १२ जून या कालावधीत अस्त असल्याने ५ मेपर्यंत लग्नांची रेलचेल आहे. नागरिक टोपी, उपरणे, गॉगल घालून भर उन्हात लग्न सोहळ्यांना हजेरी लावतात. कडक उन्हामुळे दुपारच्या लग्नातील जेवणावळीकडे अनेक जण पाठ फिरवत आहेत.

वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर होतो. दुपारी बारा ते चार या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ एकदमच कमी झाली आहे. कडक ऊन घाम फोडत असतानाच ऐन दुपारी वीजपुरवठा खंडित होण्याची परंपरा रोज येथे अनुभवास मिळत आहे. ज्यांच्याकडे इन्व्हर्टर नाही, असे नागरिक झाडांच्या सावलीचा सहारा घेत आहेत. (latest marathi news)

महिनाभरापासून बाजारपेठांमध्ये दिवसभर तुरळक ग्राहक आढळत आहेत. अनेक जण खरेदीसाठी सायंकाळी उशिरा बाहेर पडतात. ऊन व उकाड्यामुळे रसवंतिगृहे, शीतपेये, कुल्फी, आईस्क्रीम, बर्फ गोळे, लिंबू सिकंजी, सब्जा शरबत आदींचा सहारा नागरिक घेत आहेत. मालेगावच्या प्रसिद्ध मसाले ताकच्या दुकानांवर सध्या मोठी गर्दी होते. संपूर्ण मे कडक उन्हाचा सामना कसा करायचा, याची चिंता नागरिकांना सतावत आहे.

आठवडे बाजारावर परिणाम

शुक्रवारी येथे आठवडे बाजार भरतो. बाजारात भाजीपाल्यासह इतर वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात लावली होती. व्यावसायिकांनी छत्री व प्लास्टिक कागदाची सावली केली होती. पारा ४३.८ अंशांपर्यंत गेल्याने सायंकाळी पाचपर्यंत बाजारात तुरळक ग्राहक होते. वाढत्या उन्हाचा आठवडे बाजारांवरही परिणाम होत आहे. येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात शुक्रवारी शेळी, मेंढी, बकरी, कोंबडी यासह जनावरांचा बाजार भरतो. उन्हामुळे विक्रेते व ग्राहकांची संख्या मर्यादित होती.

२४ एप्रिल- ४२.०

२५ एप्रिल- ४२.०

२७ एप्रिल- ४२.०

२८ एप्रिल- ४२.०

२९ एप्रिल- ४४.०

३० एप्रिल- ४३.२

१ मे- ४३.०

२ मे- ४२.४

३ मे- ४३.८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT