Swimming pool  esakal
नाशिक

Nashik News : तपानंतर इंदिरानगरवासीयांचे जलतरण तलावाचे स्वप्न होणार पूर्ण

Nashik : आमदार सीमा हिरे यांच्या विकास निधीतून साडेसोळा कोटी रुपये खर्च करून प्रभाग ३० मधील सदिच्छानगर येथील महापालिकेच्या क्रिकेट मैदान भागात या तरण तलावाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तब्बल बारा वर्षांपासून अत्याधुनिक जलतरण तलावाचे स्वप्न बघितलेल्या इंदिरानगरवासीयांचे हे स्वप्न रविवार (ता. १०) पूर्णत्वास जात असून आमदार सीमा हिरे यांच्या विकास निधीतून साडेसोळा कोटी रुपये खर्च करून प्रभाग ३० मधील सदिच्छानगर येथील महापालिकेच्या क्रिकेट मैदान भागात या तरण तलावाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी स्वामी श्री नरेंद्राचार्य महाराज यांची विशेष उपस्थिती असणार आहे. (Nashik Indiranagar swimming pool marathi news)

२०१२ च्या सार्वत्रिक मनपा निवडणुकी नंतर पाथर्डी ते नासर्डी भागात अद्ययावत तरण तलाव व्हावा, अशी मागणी सर्वच नगरसेवकांनी लावून धरली. मात्र मोठा निधी आणायचा कुठून या प्रश्नामुळे सातत्याने हा प्रश्न मागे पडत होता. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार हिरे यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात कोणत्याही परिस्थितीत हा तरण तलाव बांधण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.

त्याची पूर्तता अखेर त्यांनी केल्याने संपूर्ण इंदिरानगर परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. ५० मीटर लांब असलेला हा तलाव आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे मापदंड लक्षात घेऊन बांधला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी केवळ स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय स्पर्धादेखील भरवण्याची सोय होणार आहे. (latest marathi news)

सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव आणि नाशिक रोडच्या बिटको येथील तलावात व्यावसायिक स्पर्धांची सोय आहे. लाखोंची वाढलेली लोकसंख्या, त्यात परिसरात नव्याने पुढे आलेले खेळाडू यांची सातत्याने हा जलतरण तलाव हवा, अशी मागणी होती. या तलावाला छत्रपती संभाजी महाराज हे नाव देण्याचे नक्की करण्यात आले आहे.

भूमिपूजन कार्यक्रमासाठी भाजप नेते महेश हिरे, स्थानिक माजी नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, ॲड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, सुनील खोडे, भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड आदींसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir: इस्रोच्या मदतीने रामललाचा अलौकिक 'सूर्याभिषेक'! ४ मिनिटे कपाळावर चमकली सूर्याची किरणे

Meta Brain : माणसाचा मेंदू कॉपी करत आहे Meta! बनवला 'डिजिटल ब्रेन'; जो पाहू अन् ऐकू शकतो, आता मशीन समजून घेणार तुमच्या भावना

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : येवला बाजार समिती सहा दिवस बंद, कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

SCROLL FOR NEXT