Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme esakal
नाशिक

Nashik Agriculture News : फळबाग योजना ठरली लाभदायक! पाच वर्षात पावणे चार हजार शेतकऱ्यांची निवड

Latest Agriculture News : २०२३ ते सप्टेंबर २०२४ पर्यंत तालुक्यातील ३ हजार ८५० शेतकऱ्यांची फळबाग योजनेत निवड झाली आहे. या योजनेमुळे तालुक्यात दिवसागणिक फळबाग क्षेत्रात वाढ होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : कांदा, मका, बाजरी, कपाशी ही पिके घेतले जाते. तालुक्यात १ लाख ८२ हजार ०३७ हेक्टर भौगोलिक क्षेत्राखाली जमीन आहे. यात १ लाख ४२ हजार ८७९ पिकाखाली क्षेत्र आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून सुरु झाली. २०२३ ते सप्टेंबर २०२४ पर्यंत तालुक्यातील ३ हजार ८५० शेतकऱ्यांची फळबाग योजनेत निवड झाली आहे. या योजनेमुळे तालुक्यात दिवसागणिक फळबाग क्षेत्रात वाढ होत आहे. (Fruit garden scheme profitable)

फळबाग योजनेत १६ प्रकारची फळे येतात. यात सीताफळ, मोसंबी, आंबा, आवळा, चिंच, जांभूळ, पेरू, चिकू, नारळ, कोकम, फणस, डाळिंब, लिंबू यासह अनेक फळपिके भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना व रोजगार हमी योजनेंतर्गत येत असतात.

राज्यात विभागानुसार शेतकरी फळ पिकांची निवड करतात. मालेगाव तालुक्यात सर्वात जास्त डाळिंब, लिंबू, मोसंबी, आवळा, चिकू, सीताफळ या फळ पिकांची लागवड होते. पात्र शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी पन्नास टक्के, दुसऱ्या वर्षी ३०, तिसऱ्या वर्षी २० असे शंभर टक्के अनुदान मिळते.

२०२३- २४ मध्ये सुमारे तीन हजार शेतकऱ्यांपैकी १८०० शेतकऱ्यांनी या फळबाग योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच २०२४-२५ या हंगामात सुमारे ८५० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना डाळिंब लागवडीसाठी १ लाख २० तर सिताफळसाठी ८८ हजार, मोसंबी, लिंबूसाठी ७२ हजार, पेरुसाठी ७५ हजार प्रती हेक्टरप्रमाणे अनुदान दिले जाते.

(latest marathi news)

या योजनेमुळे अनेक शेतकरी पारंपारिक शेती करून फळबाग शेतीकडे वळताना दिसत आहेत. मालेगाव तालुक्यात ३२ हजार ७५६ हेक्टरवर बागायत व फळपिके घेतली जात आहेत. डाळिंब १५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. जिल्ह्यात सुमारे ३५ ते ४० हजार हेक्टरवर डाळिंबाचे घेतले जातात. जून ते सप्टेंबर या कालावधीत फळबाग रोपांची लागवड होते. .

"शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फळबागेसाठी नोंदणी करावी. नोंदणी करताना सातबारा, खाते उतारा, आधार, बँक पासबुक देणे आवश्‍यक आहे. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना थेट मोबाईलवर निवड झाल्याचा मेसेज जातो. निवड झाल्यानंतर कागदपत्रांची पुर्तता करून योजनेचा लाभ मिळतो." - भगवान गोर्डे, तालुका कृषी अधिकारी, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दहिसर-भाईंदर प्रवास फक्त ५ मिनिटांत! ४५ मीटर रुंदीचा एलिव्हेटेड रोड उभारणार; बीएमसीची मोठी घोषणा

Nanded Cylinder Blast : शेतकामासाठी कुटुंब शेतात आणि घरात सिलेंडरचा स्फोट; सात लाखाचे नुकसान; तडखेल येथील घटना!

Latest Marathi News Live Update : मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील थोडक्यात बचावले

एमसीए कॉर्पोरेट शिल्ड ट्रॉफीच्या दुसऱ्या सीझनचे डेक्कन जिमखाना येथे भव्य उद्घाटन; हे सहा संघ होणार सहभागी

IND vs SA: २७ वी धाव अन् रोहित शर्माने करियरमध्ये गाठलं नवं शिखर; सचिन, द्रविड, कोहलीच्या पंक्तीत स्थान

SCROLL FOR NEXT