Sorghum, millet esakal
नाशिक

Nashik Agriculture News : जिल्ह्यात ज्वारी, बाजरीच्या पेरणीत घट! मका, कपाशी, सोयाबीनचे क्षेत्र वाढले

Nashik News : जिल्ह्यात ८८.४३ टक्के म्हणजे पाच लाख ६७ हजार ४९२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असून, यंदा शेतकऱ्यांनी मका, कपाशी आणि सोयाबीनला अधिक पसंती दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यात ८८.४३ टक्के म्हणजे पाच लाख ६७ हजार ४९२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असून, यंदा शेतकऱ्यांनी मका, कपाशी आणि सोयाबीनला अधिक पसंती दिली आहे. ज्वारी व बाजरी पीक पेरणीत घट झाली. दोन लाख ५२ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावर मका, एक लाख सहा हजार १४४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, तर ३१ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. (Sorghum millet sowing decline in district)

बाजरीकडे मात्र शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसते. जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी नंतर पाऊस लांबल्याने पेरण्या रखडल्या होत्या. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. त्यामुळे खरीप पेरणीसाठी वातावरण निर्मिती झाली, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग केली. खरीप पेरणीसाठी कृषी विभागाने जिल्ह्यात एकूण सहा लाख ४१ हजार ७७१ हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे.

यापैकी आतापर्यंत पाच लाख ६७ हजार ४९२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण झाली. त्यातील तब्बल ५० टक्के क्षेत्र हे मका, सोयाबीन आणि कपाशीने व्यापले असल्याचे दिसत आहे. यंदा एक लाख १० हजार १०८ हेक्टर क्षेत्रापैकी ६४ हजार ९२३ हेक्टरवर बाजरीचा पेरा झाला. दोन हजार ३४९ हेक्टर क्षेत्रापैकी ५२१ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे.

सोयाबीनचा पेरा सर्वाधिक

सोयाबीनचा सर्वाधिक पेरा झाला असून, मालेगाव २२९ हेक्टर, कळवण १२ हजार हेक्टर, नाशिक पाच हजार ४१६ हेक्टर, निफाड १९ हजार ७१७ हेक्टर व सिन्नर तालुक्यात ३३ हजार ५८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कपाशीचा पेरा सर्वाधिक नांदगाव तालुक्यात आठ हजार ८३९ हेक्टरवर झाला. (latest marathi news)

मालेगाव तालुक्यात २२ हजार १२० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. मका पिकाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती दिली. मालेगावमध्ये ४५ हजार १२० हेक्टर, येवला ४५ हजार १५३ हेक्टर, सिन्नर १७ हजार २९९ हेक्टर, चांदवड २२ हजार ५७४ हेक्टर, देवळा २० हजार ५७६ हेक्टर, बागलाण ३६ हजार ६६० हेक्टर.

नांदगाव ३६ हजार ५४४ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे. भुईमूग, सूर्यफूल, तीळ व कारळे या गळित धान्याची पेरणी काहीशी कमी झाली. चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भाताची लागवड वाढली आहे. सुरगाण्यात १२ हजार १६६ हेक्टर, त्र्यंबकेश्वर नऊ हजार ८०० हेक्टर, इगतपुरी २२ हजार ८८९ हेक्टर क्षेत्रावर भाताची अवनी झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

SCROLL FOR NEXT