Akshay Suresh esakal
नाशिक

Nashik News : शेतकऱ्याचा नादच खुळा! ट्रॅक्टर घेऊन लडाखला; तिसगावचा युवा शेतकरी अक्षय इखे 2 मित्रांसह ट्रॅक्टर सफारीला

Nashik News : तिसगाव (ता. दिंडोरी) येथील अक्षय सुरेश इखे हा तरुण शेतकरी चक्क ट्रॅक्टरवरून नाशिकला आपल्या दोन मित्रांबरोबर लडाखला निघाला आहे. पाच दिवसांत बाराशे किलोमीटरचे अंतर पार केले.

सकाळ वृत्तसेवा

वणी : कुठे फिरायला जायचे नियोजन करायचे असेल तर रेल्वे, विमान, बस किंवा चारचाकी वाहनाचे नियोजन केले जाते. काही पर्यटक सायकल किंवा पायीही जायचे स्वप्न पाहतात. तिसगाव (ता. दिंडोरी) येथील अक्षय सुरेश इखे हा तरुण शेतकरी चक्क ट्रॅक्टरवरून नाशिकला आपल्या दोन मित्रांबरोबर लडाखला निघाला आहे. पाच दिवसांत बाराशे किलोमीटरचे अंतर पार केले. (Akshay Suresh young farmer travel by tractor from Nashik to Ladakh)

तिसगाव येथे शेतात काम करणारा युवक चक्क ट्रॅक्टर घेऊन जगातील अद्‌भूत स्थळांपैकी एक असलेल्या लेह-लडाखला पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मार्गस्थ झाला आहे. तिसगाव ते लडाख असे दोन हजार १५० किलोमीटरचे अंतर ट्रॅक्टरला ट्रॉली लावून आवश्यक साहित्यासह लडाखच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

बर्फाळ पर्वतीय राशी, पर्वतातून खळखळणाऱ्या नद्या अशा निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद व तोही आगळ्यावेगळ्या ट्रॅक्टर सफारीने करण्याचे स्वप्न अक्षय इखेचे होते व तो प्रत्यक्षात साकारत आहे. अक्षय इखेचा छंद म्हणजे तो अनेक दिवसांपासून इन्टाग्रामवर रिल्स बनवत आहे. उदरनिर्वाहासाठी तो द्राक्ष, टोमॅटो, कांदा आदी पिकांची शेतीही करतो.

शेती करीत असताना काहीतरी नवीन करायचे स्वप्न तो पाहत होता. त्याचवेळी त्याने ठरविले, की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात ट्रॅक्टरने कुठे तरी दूर फिरायला जायचे आणि त्याचवेळी त्याने दृढनिश्चय केला, की आपला शेतातील जवळचा मित्र म्हणजे ट्रॅक्टर घेऊनच. अक्षय लडाखला शनिवारी (ता. २२) निघाला. (latest marathi news)

स्वप्नपूर्तीचा मागोवा

अक्षय इखे यास लहानपणापालून ट्रॅक्टरविषयी अधिक आकर्षण असून, ट्रॅक्टरविषयक अनेक फेसबुक लाइव्ह, इन्स्टाग्रामला त्याने व्हिडिओ अपलोड केले आहेत. लडाखला जाताना ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून पावसापासून संरक्षणासाठी प्लॅस्टिक ताडपत्रीचा वापर करून ट्रॉली बंदिस्त करीत आवश्यक कपडे, अंथरुण, पांघरून, गॅस शेगडी, शिधापाणी असे आवश्यक साहित्य सोबत घेतले. महाराष्ट्रातून लडाखला ट्रॅक्टरने येऊन जाऊन सुमारे साडेपाच हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचा पहिला शेतकरी होण्याचे अक्षय इखेचे स्वप्न आहे.

"शनिवारी मी ट्रॅक्टर व दोन मित्रांसह लडाखला निघालो. रोज अडीचशे ते तीनशे किमी अंतराचा प्रवास करीत आहे. रस्त्यात आमच्याशी ठिकठिकाणी शेतकरी व नागरिक संवाद साधत असून, त्यांच्याकडून सुकर प्रवासासाठी मार्गदर्शन व शुभेच्छाही मिळत आहे. आज (बुधवारी) चंडीगड हायवे वर कोतपुतली येथे मुक्कामी आहोत. पुढील सहा सात दिवसांत लडाखला पोहोचण्याचे नियोजन आहे." - अक्षय इखे, युवा शेतकरी, तिसगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Cafe Illegal : कॅफेत स्पेशल रूम, तिथेच बाथरूम अन् ३५० रेट; इचलकरंजीत अश्लील धिंगाणा, कंडोमची पाकिटेही सापडली...

मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, भाजप आमदाराची मागायला लावली माफी; व्हिडीओ व्हायरल झाल्यानं खळबळ

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद

Year End 2025: करा 'या' 5 हेल्थ टेस्ट, आजार ओळखणे होईल सोपे

IND vs SA, 3rd ODI: अखेर दोन वर्षांनी भारतीय संघाने जिंकला टॉस! निर्णायक सामन्यासाठी Playing XI मध्ये काय झालेत बदल?

SCROLL FOR NEXT