green field expressway esakal
नाशिक

Greenfield Expressway: नाशिकमध्येही शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात! सोलापूरप्रमाणेच ‘ग्रीन फिल्ड’चे मूल्यांकन

एकरी सात ते आठ लाखांचा भाव

विक्रांत मते

Greenfield Expressway : सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गासाठी सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जो एकरी भाव निश्चित झाला, तोच भाव नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जाहीर झाला आहे. तशा प्रकारच्या नोटिसा बजावण्यास सुरवात झाली आहे.

त्यामुळे सोलापुर, धाराशीव प्रमाणेच नाशिकमध्येही आंदोलनाच्या पावित्र्यात शेतकरी आहे. बाजारभाव ५० लाख रुपये एकर असताना शासनाला सात ते आठ लाख एकरी भाव कशाला द्यायचा, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. (Nashik also in sanctity of farmers agitation Evaluation of Greenfield Expressway like Solapur nashik news)

भारतमाला प्रकल्पांतर्गत सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड एक्स्प्रेससाठी महाराष्ट्रातील नाशिक, नगर, धाराशिव व सोलापूर या चार जिल्ह्यातील जमिनी घेतल्या जाणार आहे.

सोलापूर व धाराशिव येथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली असून, बागायती जमिनींचे मूल्यांकन एकरी सात ते आठ लाख रुपये धरल्याने एवढ्या कमी मोबदल्याविरोधात या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केले आहे.

या आंदोलनामुळे बागायती शेतीचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये महामार्गाने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना नोटिसा पाठविल्या नाही. कमी मूल्यांकन धरल्यास येथेदेखील आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची तयारी शेतकऱ्यांनी केल्याची कुणकूण प्रशासनाला लागल्याने नोटिसा पाठविल्या नाही.

यासंदर्भात ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाकडून नोटिसा पाठविण्यात आल्या. दिंडोरी तालुक्यातील रामशेज भागातील चार-पाच शेतकऱ्यांना प्रशासनाकडून नोटिसा पाठविण्यात आल्या.

त्यात एकरी सात ते आठ लाख रुपये मोबदला बागायती जमिनींना देण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना निवाड्याच्या नोटिसा मिळाल्या त्यांना भाव अमान्य असल्याने ते आता मैदानात उतरण्याच्या मानसिकतेत आहे.

काही भागात अद्यापही नोटिसा नाहीत, त्यामुळे नोटीस आल्यानंतर त्यामध्ये दर्शविलेले एकरी मूल्यांकन समोर ठेवून निर्णय घेणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गासाठी नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरवात झाली आहे. नोटिशीतील मूल्यांकन बघता ते सोलापूरप्रमाणेच असल्याचे दिसून येते. बाजारभाव ५० लाख असेल तर शासनाकडून चौपट मोबदला घेण्यापेक्षा बाजारभावाने जमीन विकलेली अधिक चांगली."- साहेबराव पिंगळे, शेतकरी.

"अद्यापपर्यंत चार ते पाच शेतकऱ्यांना नोटीस आल्याचे समजते. ज्या शेतकऱ्यांना नोटीस पाठविण्यात आली, त्यात एकरी दर फारच कमी दिसतो. झाडे, विहीरी व अन्य साधनांचा दर त्यात समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचा विचार करता चार ते पाच लाख रुपये एकरी भाव दिसतो. हा परवडणारा नाही. शासनाला परवडत नसेल तर जागेच्या बदल्यात चार पट वनजमीन द्यावी."- पंडित तिडके.

९९५ हेक्टर भूसंपादन

नाशिकमधून १२२ किलोमीटर ग्रीन फिल्ड मार्ग असून, त्यात २६ किलोमीटरचे जंगल व्यापले जाणार आहे. सुरगाणा तालुक्यात संबरकल येथे १.३५ किलोमीटरचा बोगदा आहे. महामार्गासाठी जिल्ह्यात ९९५ हेक्टर भूसंपादन होणार असून, त्यासाठी नऊ हजार कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.

‘सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे’च्या माध्यमातून अंतर कमी होणार आहे. नाशिकपासून १७६ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरत शहरात अवघ्या दोन तासात पोचणे शक्य होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सहा तालुके आणि ७० गावांमधून महामार्ग जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinnar Bus Stand Accident Video : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकातच भीषण अपघात; वेगात आलेली बस थेट फलाटवर उभ्या प्रवाशांमध्ये घुसली

Neurologist Tips For Better Sleep: तुम्हालाही झोप येत नाही? न्यूरोलॉजिस्ट सांगतात ‘या’ 3 सवयी बदलल्या तर येईल शांत झोप

StudyRoom Live Sessions: १२ वी नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सुरू करावी? जाणून घ्या सकाळ+ स्टडीरूमचे खास लाईव्ह सेशनमध्ये

India Post App : रांगेत उभे राहण्याची गरज नाही! डाक विभागाचे 'डाक सेवा २.०' ॲप लॉन्च; सर्व टपाल सेवा आता एका क्लिकवर

Horoscope Prediction : उंदीर, वाघ की डुक्कर ! चायनीज ज्योतिषशास्त्रानुसार तुमची रास आणि स्वभाव घ्या जाणून

SCROLL FOR NEXT