Bharti Pawar, Bhaskar Bhagare, Rajabhau Waje, Hemant Godse esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : राष्ट्रवादीच्या मतदारसंघात महाविकास आघाडीला कौल

Nashik News : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निर्णायक आघाडी मिळाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निर्णायक आघाडी मिळाली आहे. नाशिक शहरातील नाशिक मध्य या एकमेव मतदारसंघाने राजाभाऊ वाजेंना आघाडी मिळवून दिली. 9Nashik Lok Sabha Constituency)

त्यामुळे भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी आपल्या मतदारसंघात वर्चस्व कायम टिकवून ठेवलेले दिसते. तर राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये आत्तापासूनच अस्वस्थता निर्माण झालेली दिसून येते. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर व देवळाली विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महायुतीचा धर्म मनापासून पाळलेला दिसून येत नाही.

त्यांच्या मतदारसंघात राजाभाऊ वाजेंनी निर्णायक आघाडी घेतली. तर शहरातील नाशिक मध्य या एकमेव मतदारसंघात मुस्लिम मतदारांनी वाजेंना साथ दिल्याचे दिसून येते. याव्यतिरीक्त नाशिक पूर्व व पश्‍चिम या दोन विधानसभा मतदारसंघात आमदार सीमा हिरे व ॲड.राहुल ढिकले यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत हेमंत गोडसेंना आघाडी मिळवून दिली.

त्यांनी दिलेली आघाडी गोडसेंना विजयापर्यंत घेऊन गेली नाही. पण विधानसभेत आपला बोलबाला राखण्यात आमदारांना यश मिळाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिलेले इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी महाविकास आघाडीचे काम प्रामाणिकपणे केल्याचे मतदानातून दिसून आले.

इगतपुरीतूनही वाजेंना आघाडी मिळाल्यामुळे सिन्नर, देवळाली आणि इगतपुरी या तीन मतदारसंघांनी त्यांचा विजय निश्‍चित केला. पण आता विधानसभेचे समीकरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीच्या गोटात आता खळबळ उडण्याची शक्यता असून, कुंपणावरील नेते येत्या काही दिवसांत माघारी फिरु शकतात. (latest marathi news)

त्यांना प्रवेश द्यायचा की नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यायची याविषयी पक्ष नेतृत्वाला निर्णय घ्यावा लागेल. अशीच काहिशी परिस्थिती दिंडोरी लोकसभेतही निर्माण झाली आहे. दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यापासून त्यांच्याविषयी नकारात्मक वातावरण तयार झालेले दिसून येते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांनी फारसा रस घेतल्याचे दिसून आले नाही.

त्यामुळे भगरेंना याठिकाणी ८१ हजारांचा ‘लिड’ मिळाला. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढली असून, झिरवाळांच्या विरोधात उमेदवार देऊन त्याला निवडून आणताना काय चाल खेळली जाते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष असलेल्या झिरवाळांना शांत बसण्यास मजबूर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचा पुरेपुर फायदा उठवला.

आता विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्याविषयी काय भूमिका घेतली जाते, यावर झिरवाळांचे गणित अवलंबून असणार आहे. अशीच परिस्थिती कळवण-सुरगाण्यात दिसून येते. राज्यमंत्री डॉ.भारती पवारांनी आमदार नितीन पवार यांच्या घरी भेट देत आमच्यातील ‘वैर’ संपल्याची भावना बोलून दाखवली. पण त्याचे कृतीत फारसे रुपांतर झालेले दिसून आले नाही. सुरगाणा व कळवणमध्ये त्यांना फटका बसला.

आपली कौटुंबिक नाराजी दूर करताना त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच झालेला दिसून येतो. कारण आमदारांवर नाराज असलेले लोक खासदारांसोबत येतात. पण त्यांनीच सख्य राखल्यामुळे लोकांची नाराजी अजून वाढली. आता विधानसभेत खरी रंगत येणार आहे. कारण नितीन पवार हे अजित पवारांबरोबर आहेत आणि माकपने महाविकास आघाडीचा धर्म पाळल्याचे मतपेटीतून उघड झाले आहे.

अशा परिस्थितीत त्यांना मदत करण्याशिवाय महाविकास आघाडीकडे दुसरा पर्याय दिसत नाही. त्यामुळे नितीन पवारांची आता खरी कसोटी आहे. निफाडमध्ये माजी आमदार अनिल कदम यांना अपेक्षित मताधिक्य देण्यात अपयश आलेले दिसते. पण महाविकास आघाडीचे नेते आपल्यासोबत असल्यामुळे तुतारीच्या आवाजाने त्यांचा ‘कॉन्फिडन्स’ उंचावला आहे.

त्याला विद्यमान आमदार दिलीप बनकर कसे प्रत्युत्तर देतात यावर पुढची लढाई स्पष्ट होईल. येवल्यातही महाविकास आघाडीला थोडी आघाडी मिळाली पण, मंत्री भुजबळांनी या निवडणुकीत फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही म्हणून हे घडले असावे. कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फार मोठी आघाडी मिळाली होती. यंदा येथील मतदारांनी भगरेंना साथ दिल्याचे दिसून येते.

त्यामुळे भुजबळांसाठीही येणारी निवडणूक फार सोपी नसणार हे स्पष्ट झाले आहे. चांदवड व नांदगाव हे दोनच मतदारसंघ असे आहेत, ज्यांनी डॉ.भारती पवारांना साथ दिली. नांदगावने ४० हजारांची आघाडी देत आपला शब्द खरा ठरवला तर चांदवडमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसचे दिग्गज नेते असतानाही आमदार डॉ. राहुल आहेरांनी भाजपला आघाडी मिळवून आपली ‘गॅरंटी’ सिद्ध केली आहे. आमदारांना त्यांचा मतदारसंघ सध्यातरी ‘फॉर’ झालेला दिसतो. येत्या तीन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या रिंगणात आमदारांचे अस्तित्व पणाला लागेल, हे निश्‍चित!

….कुठे काय घडले?

नाशिक लोकसभा.....हेमंत गोडसे.....राजाभाऊ वाजे....आमदार

सिन्नर...............३१२५४.................१५९४९२ (१ लाख २८ हजार २३८ मतांची आघाडी).....ॲड. माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)

नाशिक पूर्व...........१००३११.............८९९११ (१० हजार ४०० मतांनी पिच्छाडीवर) ॲड.राहुल ढिकले (भाजप)

नाशिक मध्य...........८४९०६............८८७१२ (३ हजार ८०६ मतांची आघाडी)....देवयानी फरांदे (भाजप)

नाशिक पश्‍चिम.........१२४८२७........९३६१७ (३१ हजार २१० मतांची पिच्छाडी) सिमा हिरे (भाजप)

देवळाली.......५४०६४..........८१२००...........(२७ हजार १३६ मतांची आघाडी) सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

इगतपुरी..........५८०५२............१०१५८५.....(४३ हजार ५३३ मतांची आघाडी) हिरामण खोसकर (काँग्रेस)

...

दिंडोरी मतदारसंघ..........डॉ.भारती पवार............भास्कर भगरे.......आमदार

नांदगाव........१०३००१......................६१३३६ (४१ हजार ६६५ मतांनी पिच्छाडीवर).....सुहास कांदे (शिवसेना)

कळवण..............५६४६१...................११४१३४ (५७ हजार ६७३ मतांची आघाडी)......नितीन पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

चांदवड............९५३२५.................७८५७८ (१६ हजार ७४७ मतांनी पिच्छाडीवर) डॉ.राहुल आहेर (भाजप)

येवला............८०२९५..................९३५०० (१३२०५ मतांची आघाडी).... मंत्री छगन भुजबळ

निफाड.............७१३७०.............८९५५४ (१८१८४ मतांची आघाडी)......दिलीप बनकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

दिंडोरी.............५५८८१..............१३८१८९ (८२ हजार ३०८ मतांची आघाडी) नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT