Vote Counting esakal
नाशिक

Nashik Vote Count : स्ट्राँग रुम भोवतीचा परिसर ‘सील’; लोकसभा निवडणूकीची उद्या मतमोजणी

Vote Count : नाशिक, दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी मंगळवारी (ता.४) होते आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Vote Count : नाशिक, दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी मंगळवारी (ता.४) होते आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील वेअर हाऊस येथे मतमोजणी होणार असल्याने या परिसरात सार्वजनिक वाहतूकीला प्रवेश बंद केला आहे तर वेअर हाऊसचा स्ट्राँग रुम परिसराभोवती कडेकोट पोलिस बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे. तसेच सहायक आयुक्तांच्या आदेशानुसार या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला. ()

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचे इव्हीएम मशिन अंबड वेअर हाऊस येथील स्ट्राँग रुममध्ये ठेवले असून, मंगळवारी (ता. ४) याठिकाणी मतमोजणी होणार आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. तर वाहतूक उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी वाहतूक मार्गात बदल केल्यासंदर्भातील अधिसूचनाही जारी केली आहे.

तर, उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड वेअर हाऊस परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्तासह सुरक्षेच्या सज्जतेची पाहणी केली आहे. तर, मतमोजणीच्या दिवशी मंगळवारी याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अंबड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी कलम १४४ लागू केल्याचे आदेश जारी केले आहेत. (latest marathi news)

असे आहेत आदेश

- वेअर हाउस भोवतीचा १०० मीटर परिसरात प्रवेश बंदी

- वाहतूक मार्गात बदल; पर्यायी मार्गांचा वापर करावा

- प्रतिबंधित क्षेत्रात सेल्युलर फोन, मोबाइल, कॉडलेस फोन, आयपॅड, स्मार्ट वॉच नेण्यास बंदी

- ज्वलनशील पदार्थ, अग्निशस्त्रे, घातकशस्त्रे बाळगण्यास मनाई

- निवडणूक निर्णय अधिकार्याकडून प्रमाणित ओळखपत्रधारकांनाच प्रवेश

''मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे पोलिस चौकीच्या हद्दीमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मनाई आदेशही जारी करण्यात आले असून त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे कोणीही उल्लंघन करू नये. पोलिसांना सहकार्य करावे.''- शेखर देशमुख, सहायक पोलिस आयुक्त, अंबड विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

Tukaram Munde news: मुंढेंचा दणका, अकोल्यात गुटख्याचा कारखाना उद्धवस्त..50 लाखांचा माल जप्त..

SCROLL FOR NEXT