Manik Patki esakal
नाशिक

Nashik News : युएनच्या स्पेशल फोर्समध्ये सहायक आयुक्त पत्की! महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला अधिकारी

Nashik News : देशभरातील ६९ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातून निवड झालेल्या माणिक पत्की या एकमेव महिला अधिकारी आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जगात शांतता व मानवता प्रस्थापित करण्यासाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड नेशन (युएन)च्या युनायटेड नेशन पीस किपिंग फोर्स यात राज्य गुप्तवार्ता विभागाच्या नाशिकमधील सहायक आयुक्त माणिक पत्की यांची निवड करण्यात आली आहे. देशभरातील ६९ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातून निवड झालेल्या माणिक पत्की या एकमेव महिला अधिकारी आहेत. (Nashik Assistant Commissioner Patki in UN Special Force)

जगभरातील अनेक देशांमध्ये आजही युद्ध, अन्न-धान्याची कमतरता, शिक्षणाचा अभाव, देशांतर्गत गृहकलह यामुळे अशांतता आहे. अशा देशांमध्ये, तेथील नागरिकांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, तेथील जनजीवन पूर्वपदावर यावे, यासाठी युनायटेड नेशन पिस किपिंग फोर्सच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातात. युएनच्या या विशेष फोर्सच्या माध्यमातून जगभरातील पोलीस दलातील अधिकारी वर्षभर अशा देशांमध्ये जाऊन त्याठिकाणी शांतता निर्माण करण्यासाठी सेवा बजावत असतात.

युएनच्या या फोर्समध्ये निवडीसाठी राष्ट्रीय पातळीवर देशभरातील पोलीस अधिकाऱ्यांकरीता परीक्षा घेण्यात येत असते. २०२२-२०२४ या वार्षिक गटासाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये देशभरातून ६९ पोलिस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. (latest marathi news)

त्यात महाराष्ट्र पोलिस दलातील माणिक पत्की या एकमेव महिला अधिकारीचा समावेश आहे. पत्की यांनी मुंबई, सांगली, सीआयडी, सीबीआय, नागपूर, नाशिक येथे सेवा बजावली आहे. सध्या त्या नाशिकमध्ये राज्य गुप्तवार्ता विभागात सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

‘जुबा’मध्ये नियुक्ती

माणिक पत्की यांनी परीक्षेत यश प्राप्त केल्याने त्यांची युएनच्या विशेष फोर्समध्ये एका वर्षासाठी निवड झालेली आहे. त्या पूर्व आफ्रिकेतील दक्षिण सुदान या देशात ५ जूनपासून रुजू झाल्या आहेत. त्यांच्याकडे ‘जुबा’ या शहरात क्षेत्रीय अधिकारी (फिल्ड ऑफिसर) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 3rd ODI: Yess... जिंकलो! केएल राहुलने कॉईन उडवण्यासाठी लढवली शक्कल, टॉस जिंकताच कशी होती भारतीय खेळाडूंची रिअॅक्शन

Nanded Train: महाराष्ट्राशी जोडला गेला यूपीचा हा जिल्हा; आठवड्यातून एकदा करता येणार प्रवास, केंद्रीय मंत्र्यांचे प्रयत्न झाले यशस्वी

Year Ender 2025 : 15 हजारपेक्षा कमी किंमतीचे 2025 मधील Top 5 Best 5G Smartphones

Ichalkaranji Cafe Illegal : कॅफेत स्पेशल रूम, तिथेच बाथरूम अन् ३५० रेट; इचलकरंजीत अश्लील धिंगाणा, कंडोमची पाकिटेही सापडली...

Dr. Babasaheb Ambedkar: 'बाबासाहेबांच्या प्रत्येक मूर्तीला संरक्षक भिंत आणि छत मिळणार'; महापरिनिर्वाण दिनी योगींची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT