देवळाली कॅम्प : देवळाली साऊथ एअरफोर्स येथे केंद्र सरकारच्या विविध पदांसाठी असलेल्या अठरा जागांसाठी तीन दिवस दोन सत्रात लेखी परीक्षा घेण्यात आली. यात हजारो तरुणांनी सहभाग घेतला. यामुळे या भागात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.
७ व १३ ऑक्टोबरला देशभरात एम्प्लॉयमेंट न्यूज पेपरमध्ये आलेल्या जाहिराती नुसार देवळाली एअरफोर्स स्टेशन साऊथ देवळाली कॅम्प (नाशिक) येथे स्टोअर सुपरवायझर (एसएस) ७, स्टोअर कीपर (एसके) २, लष्कर फोर क्लास (एमटीएस) ९, अशा एकूण केंद्र सरकारच्या १८ जागेसाठी देवळाली एअरफोर्स स्टेशन हवाई दलाच्या विभागाने नोकर भरतीसाठी देशभरातील विविध राज्यातून अर्ज मागविले होते.
त्यानुसार महाराष्ट्र, बिहार, यूपी, एमपी, कर्नाटक यासह दहा ते बारा राज्यातील सुमारे अठरा हजार बेरोजगार तरुण युवक भरतीसाठी आले. त्याची लेखी परीक्षा २६ ते २८ ऑक्टोबरपर्यंत दोन सत्रात झाली. परीक्षेला मोठी गर्दी झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.