A terrible fire broke out at an auto com company in Malegaon MIDC. esakal
नाशिक

Nashik Fire Accident : माळेगाव वसाहतीतील ऑटो कॉम कंपनीला आग! मोठी वित्तहानी

Nashik News : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील ऑटो स्पेअर पार्ट्‌स बनविणाऱ्या सिन्नर ऑटो कॉम या ऑटोमोबाईल्स कारख्यानाला रविवारी (ता. १४) सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान भीषण आग लागली.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील ऑटो स्पेअर पार्ट्‌स बनविणाऱ्या सिन्नर ऑटो कॉम या ऑटोमोबाईल्स कारख्यानाला रविवारी (ता. १४) सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान भीषण आग लागली. क्षणार्धात आगीचे लोळ सर्वदूर दिसू लागल्याने अनेकांनी कंपनीकडे धाव घेतली. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नसली, तरी मोठी वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. (Auto com company in Malegaon Colony on fire Big financial loss)

सिन्नर अग्निशमन दल व एमआयडीसी अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे चार ते पाच तास अथक शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आगीत वरचा मजला पूर्ण खाक झाला आहे. ऑटोकॉम प्रा. लि. कंपनीत रविवारी सायंकाळी कामगार काम करीत असताना, अचानक दुसऱ्या मजल्यावर आग लागली. आग निदर्शनास येताच कामगारांना सुरक्षित कंपनीबाहेर काढण्यात आले.

घटनेची माहिती माळेगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाला दिली. त्यावरून अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. आग मोठ्या प्रमाणात असल्याने सिन्नर पालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. दोन्ही दलाच्या बंबांच्या सुमारे आठ ते नऊ फेऱ्या होऊन आग आटोक्यात आणण्यात यश आले. (latest marathi news)

आगीत कारखान्याचा दुसरा मजला पूर्णपणे खाक झाला असून, तेथे ठेवलेले लाखोंचे पॅकिंग मटेरियलचे नुकसान झाल्याचे समजते. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती ‘सीमा’चे सचिव बबन वाजे यांनी दिली.

या कारखान्यात विविध वाहनांचे स्पेअर पार्ट बनविण्यात येतात. कारखान्यात साधारणतः एका शिफ्टमध्ये २०० ते २५० कामगार काम करतात. सुदैवाने सर्व कामगार सुरक्षित असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT