Onion Auction esakal
नाशिक

Nashik Onion Auction : कांदा उत्पादकांची ससेहोलपट थांबवा : बापूराव पिंगळे

Onion Auction : जिल्ह्यातील कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा लिलाव आठ दिवसांपासून बंद आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Auction : जिल्ह्यातील कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा लिलाव आठ दिवसांपासून बंद आहेत. हमाली, तोलाई, वाराई कपात व लेव्ही प्रश्नांवरून व्यापाऱ्यांनी हा अघोषित बंद पुकारला आहे. राज्यात सर्व बाजार समित्यांना नियमावली एकच आहे. इतर जिल्ह्यांतील बाजार समित्या सुरळीत सुरू आहे. मग जिल्ह्यातील बाजार समित्यांना कामकाज करण्यास काय अडचण आहे. यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Nashik Baburao Pingle statement on stop onion farmers problems )

नियमानुसार कोणतीही बाजार समिती तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद ठेवता येत नाही. असे असताना आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस बाजार समित्या बंद ठेवून शासन नियमांचे उल्लंघन तर आहेच. परंतु यामुळे कांदा उत्पादक शेतकरीसुद्धा मेटाकुटीला आले आहेत. ‘दैव देते व कर्म नेते’ अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. ‘बाप भीक मागू देत नाही व आई काम करू देत नाही’, याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकरी कात्रीत सापडला आहे. (latest marathi news)

केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून दहा हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. तरीसुद्धा कांदा लिलाव बंद असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. हमाली, तोलाई, वाराई, लेव्ही हे विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकरीहिताचा विचार करून सामोपचाराने लिलाव त्वरित सुरू करावे व बळीराजास सहकार्य करावे, असे आवाहन भाजप नाशिक महानगर जिल्ह्याच्या किसान मोर्चाचे अध्यक्ष बापूराव पिंगळे यांनी केले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा म्हणून सोमवारी (ता. ८) डॉ. भारती पवार यांच्याबरोबर किसान मोर्चाची मीटिंग झाली. त्यांनी त्वरित जिल्हाधिकारी व जिल्हा सहकार उपनिबंधक यांना बैठक घ्यायला सांगितली. आचारसंहितेमुळे त्यांना या बैठकीला उपस्थित राहता आले नाही. तरीसुद्धा या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बंदमुळे सर्व नुकसान शेतकऱ्यांचेच होत आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, असे बापूराव पिंगळे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

'लाल लाल कलरची बांगडी...'नऊवारी साडी अन् मराठमोळा लूक, शिल्पा शेट्टीचा डान्स पाहिलात का? Viral Video

QR स्कॅन करण्यापासून ते खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत, UPI नेमकं कसं काम करतं? वाचा पडद्यामागची संपूर्ण कहाणी

Marathi News Live Updates : जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य, ऐन सणासुदीत असं... : मंत्री चंद्रकांत पाटील

Mumbai Ganeshotsav:लालबागच्या गर्दीवर रेल्वे पोलिसांचा वॉच: चिंचपोकळी, करी रोडवर २१९ आरपीएफ जवानांसह ५५ तिकीट तपासनीस

SCROLL FOR NEXT