A derailed train, broken rocks in the second photo. The last third photo shows the trash on the corner outside the park esakal
नाशिक

Nashik News : कृष्णनगर उद्यानाचे सौंदर्य लयास; बंद कारंजाच्या टाकीत पाणी

Nashik : लहान मुलांच्या खेळण्यावर कललेला वृक्ष अशा समस्यांमध्ये अडकलेल्या कृष्णनगर उद्यानाचे सौंदर्य लोपले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : रुळांच्या ट्रॅकमध्ये अडकून गंजलेली मीनी ट्रेन, पारांच्या उखडलेल्या फरशा, बंद कारंजाच्या टाकीत साचलेले पाणी, जॉगिंग ट्रॅकचे उखडलेले कठडे, लहान मुलांच्या खेळण्यावर कललेला वृक्ष अशा समस्यांमध्ये अडकलेल्या कृष्णनगर उद्यानाचे सौंदर्य लोपले आहे. १९९७ च्या पंचवार्षिकमध्ये विकसित केलेले हे उद्यान काही शहरातील सर्वात आकर्षक उद्यान म्हणून ओळखले जात होते. या उद्यानाची देखभाल व दुरुस्ती होत असली तरी त्याला पूर्वीचे वैभव लयास गेले आहे. (bad condition of Krishnanagar Park in panchavati )

पंचवटीतील जुना आडगाव नाका परिसरातील या उद्यानातील मुलांना खेळण्यासाठी असलेल्या खेळण्या सुस्थितीत आहे. त्यामुळे येथे सकाळी-सायंकाळी मोठ्या संख्येने मुले खेळण्यासाठी येतात. परिसरातील नागरिकांचाही या उद्यानात राबता असतो. जॉगिंग करणाऱ्यांसाठी या उद्यानाचा वापर होतो. उद्यानाची देखभाल होत असली तरी येथील पूर्वीचे आकर्षण पुन्हा आणले जात नसल्याची खंत नागरिकांसह बालगोपलांकडून व्यक्त होत आहे.

उद्यानातील मुख्य आकर्षण असलेली कृष्ण एक्स्प्रेस ही मीनी ट्रेन ट्रॅकवरच अडकून ट्रॅकसह गंजत आहे. या ट्रेनसाठीचा प्लॅटफॉर्म वापरात नाही. येथील टिकीट खिडकीही अजून शाबूत आहे. लहान मुलांना उद्यानाची सफर घडून आणणारी ही ट्रेन पुन्हा कधी सुरु होईल याची प्रतीक्षा लहान मुलांसह पालकांकडून व्यक्त केली जात आहे. उद्यानातील कारंजाही बंद पडलेला आहे. या कारंजाचे पाइप, तोट्या, टाकी अजूनही येथे शाबूत आहे. या टाकीत पावसाचे पाणी साचलेले आहे. (latest marathi news)

काँक्रिटकरणात वृक्षाचे खोड अडकले

येथे नव्याने दिवे बसविलेले आहेत. त्यांच्या खाली बसण्यासाठी पार बांधलेले आहेत. या पारांच्या फरशा निघालेल्या आहेत. जॉगिंग करण्यासाठी येथे सकाळी व सायंकाळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. ट्रॅकवरचे पेव्हर ब्लॉकदेखील निघून गेले आहेत. तसेच काही ठिकाणचे कठडे तुटले आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारच्या खेळण्या आहेत.

त्यामुळे मुलांची येथे गर्दी होत असते. या खेळण्या ज्या ठिकाणी आहेत. त्यांच्यावरच्या बाजूला एका मोठ्या वृक्षाच्या फांद्या आहेत. हा वृक्ष उद्यानाच्या बाहेरच्या बाजूला असून तो उद्यानाच्या संरक्षक भिंतीवर कलला आहे. त्यामुळे उद्यानाच्या संरक्षक भिंतीच्या जाळी वाकली आहे. काँक्रिटकरणात या वृक्षाचे खोड अडकल्याने हा वृक्ष धोकादायक ठरू शकतो.

कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई व्हावी

कृष्णनगर उद्यानाच्या पूर्वेकडील बाजूच्या कोपऱ्यावर कचरा पडलेला दिसतो. तसेच दुसऱ्या कोपऱ्यावरदेखील कचरा व शिळे अन्न टाकलेले दिसून येते. विशेष म्हणजे या भागात नित्य कचरा उचलून नेला जातो व घंटागाडी ही येत असते , मात्र तरी देखील आजूबाजूला राहणारे नागरिक हे या ठिकाणी कचरा टाकत असतात. यावर मनपाने लक्ष केंद्रित करून संबंधित कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी पर्यावरणप्रेमी कडून होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT