ram setu bridge  esakal
नाशिक

Nashik News : रामसेतूचे भवितव्य अखेर रामभरोसे! नवीन पूल दूरच, दुरुस्तीबाबतही चालढकल

Nashik : शहरातून पंचवटीत जाण्यासाठी व पंचवटीतून शहरात येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून तत्कालीन नगरपालिकेच्या काळात गोदावरीवर रामसेतूची निर्मिती करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातून पंचवटीत जाण्यासाठी व पंचवटीतून शहरात येण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून तत्कालीन नगरपालिकेच्या काळात गोदावरीवर रामसेतूची निर्मिती करण्यात आली. परंतु आजवर अनेक छोट्या पुरांबरोबरच तब्बल चार महापूर अनुभवलेल्या रामसेतूची अवस्था मनपासह स्मार्टसिटीच्या दुर्लक्षाने सध्या तोळामासा झाली आहे. तत्कालीन नाशिक नगर पालिकेच्या काळात कै. भय्यासाहेब पांडे नगराध्यक्ष असताना रामसेतूची उभारणी करण्यात आली. (nashik bad condition of Ram Setu ram bridge marathi news)

अनेक पूर अनुभवलेल्या रामसेतूवरील स्लॅब वाहून गेल्याने पुलाला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच अतिक्रमणाने हा पूल अधिक जर्जर व बकाल झाला आहे. पुलावरून वाहने नेण्यास मज्जाव असतानाही अनेक जण थेट पुलावरच दुचाकींसह रिक्षाही उभ्या करतात. तसेच वाहतूकही बिनदिक्कत सुरू आहे.

मध्यंतरी गोदाघाटावरील इतर स्मार्ट कामांबरोबरच या पुलाच्या जागी भव्य व कमानींच्या आकाराचे पुलाचे नियोजन करण्यात आले होते. येतील काही व्यावसायिकांच्या विरोधानंतर स्मार्ट सिटीने तो प्रकल्पच गुंडाळून ठेवला. नंतर शासकीय संस्थेच्या माध्यमातून या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आल्यावर नवीन पुलाऐवजी डागडुजी करण्याचे ठरले.

परंतु गोदाघाटावरील बहुतेक कामे संपत आली तरी कंपनीचे दुरुस्तीचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे पुढील काळात हा पूल किती काळ शहर व पंचवटीचा सेतू म्हणून काम करेल, याबाबत साशंकताच आहे. (latest marathi news)

अतिक्रमणाने बकाल स्वरूप

पुलावरील सिमेंटचा स्लॅब अनेक ठिकाणी वाहून गेल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच दोन्ही बाजूंनी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने तसेच ऊन लागू नये, म्हणून कठड्यावर प्लॅस्टिकसह ताडपत्री, गोण्या, दोरखंडाने बांधल्याने पुलाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. पुलाला खेटून व चक्क नदीपात्रात बांधण्यात आलेल्या येथील हॉटेलच्या मालकाने याच व्यावसायिकांच्या मदतीने नवीन पुलास विरोध केल्याने ते काम रद्द झाल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नवीन पूल सोडाच पुलाची दुरुस्तीही झालेली नाही.

''शहरातून पंचवटीत जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. त्यामुळे नवीन पूल होत नसेल तर किमान या पुलाची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करून पुलाला बळकटी द्यावी.''- दत्ता पवार, स्थानिक व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT