Assembly Constituency  esakal
नाशिक

Baglan Assembly Constituency : डॉ. भामरेंनाच पाठबळ; पण मताधिक्य घटले

Assembly Constituency : डॉ. सुभाष भामरे यांची विजयाची हॅटट्रिक हुकली असली, तरीही बागलाण विधानसभा मतदारसंघात त्यांच्याच नावाचा बोलबाला राहिल्याचे गावनिहाय मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

अंबादास देवरे

सटाणा : धुळे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे डॉ. सुभाष भामरे यांची विजयाची हॅटट्रिक हुकली असली, तरीही बागलाण विधानसभा मतदारसंघात त्यांच्याच नावाचा बोलबाला राहिल्याचे गावनिहाय मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. असे असले, तरी गतवेळेपेक्षा त्यांचे मताधिक्क्य तब्बल ५२ हजारांनी घटले आहे, हेही नाकारता येणार नाही. (Baglan Assembly Constituency)

भाजपला आपण कुठे कमी पडलो, याचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. दुसरीकडे अल्पमताने निवडून आलेल्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांमध्ये श्रेयवादाची मोठी लढाई सुरू झाल्याचे दिसते, तीही चिंतन करायला लावणारी आहे.

सटाणा शहरासह ब्राह्मणगाव, लखमापूर, नामपूर, ताहाराबाद, अंतापूर, वीरगाव, जायखेडा, आसखेडा या प्रत्येक निवडणुकांमध्ये निर्णायक राहणाऱ्या व प्रमुख मोठ्या गावांमध्ये एकूणच महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांचे नेते, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या गावांमध्ये डॉ. भामरे यांचेच मताधिक्य टिकून राहिले. आदिवासी पश्चिम पट्ट्यातील पठावे दिगर व मुल्हेर जिल्हा परिषद गटात मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटले.

गेल्या दहा वर्षांत भामरे यांनी सटाणा शहरासाठी पुनंद धरण पाणी योजना, केळझर चारी क्रमांक आठ, हरणबारी डावा व उजवा कालवा, अप्पर पुनंद प्रकल्प हे महत्त्वाकांक्षी सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावल्याने बागलाणवासीयांनी मतपेटीतून त्यांचे ऋण व्यक्त केल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसते. (latest marathi news)

धुळे लोकसभा मतदारसंघात बागलाणमध्ये डॉ. भामरे यांना एक लाख १६६ मते, तर डॉ. बच्छाव यांना ७८ हजार २५३ मते मिळाली आहेत. यात डॉ. भामरे यांना २१ हजार ९१३ मतांचे मताधिक्य मिळाले असले, तरीही गतवेळेपेक्षा ५२ हजार ८७ मतांनी ते घटले, हे विशेष. डॉ. भामरे यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील अपुऱ्या जलसिंचन योजना, जलजीवन योजना.

शेततळे, रस्त्यांची कामे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावताना २५ ते ३० वर्षांपासून रखडलेले साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचा सटाणा शहराबाहेरून जाणारा वळण रस्ता (सटाणा बायपास) होणे, साक्री-शिर्डी राज्य महामार्गाचे रखडलेले काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लावण्याचे आव्हानही खासदार बच्छाव यांच्यासमोर राहणार आहे. केंद्राच्या मदतीने मतदारसंघातील लोकोपयोगी विकासकामे करण्यासाठीही सातत्य ठेवावे लागेल.

योगी आले अन योग फिरला

डॉ. सुभाष भामरे यांच्या अनपेक्षित पराभवाचे प्रमुख कारण मालेगावला झालेली योगी आदित्यनाथ यांची सभा ठरल्याचीही खुलेआम चर्चा होत आहे. धुळे लोकसभा निवडणुकीत नेहमी निर्णायक राहणाऱ्या मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघात योगी यांनी मुस्लिम समाजावर केलेल्या टीकेमुळे अवघा मुस्लिम समाज एकवटला. दुपारी बाराच्या आत मतदान केंद्रांवर जाऊन १०० टक्के मुस्लिम बांधवांनी मतदान करून निकाल जाहीर होताच हिरव्या गुलालाची उधळण केली, याचीही बागलाण विधानसभा मतदारसंघात चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT