Effects on filming esakal
नाशिक

कोरोनामुळे चित्रीकरणावर परिणाम

निर्बंध लागल्यानंतर सेटवर मनुष्यबळ कमी करण्यावर भर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना संसर्ग(Coronain fection) वाढत असल्याने कडक निर्बंध (Strict restrictions) लावण्यात आले असून या निर्बंधाचा चित्रीकरणावरही परिणाम (Effects on filming) झाला असल्याचे दिसत आहे. नऊ ते सहा या वेळेत निर्बंध लागू असल्याने रात्रीच्या चित्रीकरणाचे चित्रण रद्द करण्यात आले असून, कोरोना वाढती रूग्णसंख्या पाहता सेटवरचे मनुष्यबळही कमी करण्यात आली आहे.

कोरोना दुसऱ्या लाटेनंतर सरकारने चित्रीकरणास परवानगी दिली होती. नाशिकमध्ये, वेबसिरीज, मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. सध्या दोन मालिकांचे चित्रीकरण शहराच्या जवळील परिसरात होत आहे. कोरोना निर्बंध लागू झाल्यानंतर चित्रीकरणाला पुन्हा एकदा फटका बसत असल्याचे चित्र आहे. निर्मात्यांना कोरोनाचे नियम पाळत चित्रीकरण करावे लागत असून, तांत्रिक बाबी, कॅमेरा ऑपरेशन, मेकअपमॅन, एडिटिंग, सेट उभारणे आदींचे मनुष्यबळ कमी करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आणखी निर्बंध कडक होण्याची शक्यता आहे. यात चित्रीकरणावर निर्बंध लागल्यास मालिका, निर्मात्यांचे आर्थिक गणित पुन्हा बिघडणार आहे. कोरोना पहिल्या दोन लाटांमध्ये निर्मात्यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. निर्बंध लागल्यास पुन्हा शिथिल होण्यास मोठा विलंब होत असल्याची भीतीदेखील व्यक्त होत आहे.

त्यामुळे निर्बंध लावताना चित्रीकरणातील सर्वच घटकांचा विचार व्हावा अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

"कोरोना निर्बंध लागू झाल्यानंतर ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेच्या सेटवरचे मनुष्यबळ कमी करण्यात आले आहे. तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळून मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे."

- संजय झनकर, निर्माता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बैठकीला गैरहजर राहणं म्हणजे पक्ष सोडणं नव्हे? ठाकरे गटाला मोठा धक्का? शिंदे गटाच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद

Pension Update: पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! 12 वर्षांनंतर पेन्शन वाढणार? दिल्लीत महत्त्वाची बैठक

समरचा अ‍ॅक्शन अवतार पाहून स्वानंदी घायाळ! गुंडाशी दोन हात करणार, veen doghatli hi tutena चा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

India WTC Final Qualification Scenario : भारताला न्यूझीलंडविरुद्धची मालिका २-० ने जिंकणं, का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या कसोटी वर्ल्ड कप फायनलसाठीचे समीकरण

Latest Marathi News Live Update : ठाणेकरांना डिसेंबरअखेर मेट्रो प्रवासाची भेट मिळणार

SCROLL FOR NEXT